सिंगल डोस 'स्पुटनिक V लाईट'चे लवकरच भारतात आगमन!

Sputnik V Light
Sputnik V Light
Summary

औषध कंपनी डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजने (Dr Reddy's Laboratories) रशियाची स्पुटनिक V (Sputnik V) लस भारतीय बाजारात लॉन्च केली आहे

मॉस्को- औषध कंपनी डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजने (Dr Reddy's Laboratories) रशियाची स्पुटनिक V (Sputnik V) लस भारतीय बाजारात लॉन्च केली आहे. रशियन डायरेक्ट इन्वेस्टमेंट फंडचे प्रमुख Russian Direct Investment Fund (RDIF) CEO किरिल दिमीत्रेव म्हणाले आहेत की, या वर्षाच्या शेवटपर्यंत भारतात 85 कोटी स्पुटनिक लशींचे उत्पादन घेण्यात येईल. तसेच स्पुटनिक v लशीची दुसरी बॅच या आठवड्याच्या शेवटापर्यंत भारतात दाखल होईल. (Sputnik V Light single Covid19 dose vaccine RDIF CEO)

किरिल दिमीत्रेव यांनी रशियाच्या बहुचर्चित स्पुटनिक V लाईट (Sputnik V Light) लशीबाबत प्रतिक्रिया दिली आहे. स्पुटनिक V लाईट लस भारतात लवकरच लॉन्च करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं ते म्हणाले आहेत. एएनआयने यासंदर्भातील माहिती दिली आहे. स्पुटनिक V लाईट लशीचा एकच डोस पुरेसा असतो. ही गोष्ट या लशीचा विशेष ठरवते. जगात जॉन्सन आणि जॉन्सन कंपनीच्या लशीचाही एक डोस कोरोनावर प्रभावी ठरत आहे.

रशियाच्या 'स्पुटनिक V' (Sputnik V) लशीची किंमत भारतात 995.40 रुपये असणार आहे. डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजने यासंदर्भातील माहिती दिली आहे. 'स्पुटनिक V' लस 91.6 टक्के प्रभावी असल्याचं सांगण्यात आले आहे. शिवाय भारताने मंजुरी दिलेली स्पुटनिक V ही तिसरी लस ठरली आहे. विशेष म्हणजे या लशीचा वापर सुरु झाला असून पहिला डोस हैद्राबादमध्ये देण्यात आला आहे. लशींच्या किंमतीवर 5 टक्के जीएसटी लागू असेल. लशींची निर्मिती भारतात होऊ लागल्यास याची किंमत आणखी कमी होईल, असं डॉ. रेड्डीजने सांगितलंय.

लस पुढच्या आठवड्यापासून बाजारात उपलब्ध होईल. स्पुटनिक लशीची पहिली खेप 1 मे रोजी भारतात दाखल झाली होती. 13 एप्रिलला या लशीच्या आपात्कालीन वापराला मंजुरी देण्यात आली होती. पुढील खेप काही दिवसांत दाखल होणार असल्याचं सांगण्यात आलं. भारतातील डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज देशात स्पुटनिक लशीचे उत्पादन करणार आहे. त्यानंतर या लशीची किंमत आणखी कमी होण्याची शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com