
अभिनेते सूर्या शिवकुमार हे मत मांडताना त्यांनी थेट न्यायालयाचा उल्लेख केल्यामुळे मद्रास उच्च न्यायालयाच्या एका न्यायधीशांनी त्यांच्यावर न्यायालयाचा अवमान केल्याचा ठपका ठेवला आहे.
चेन्नई - ‘नीट’ परीक्षेवरुन देशभरात काही ठिकाणी विरोध होत असताना दक्षिणेतील अभिनेते सूर्या शिवकुमार हे एका टिपणीमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. मत मांडताना त्यांनी थेट न्यायालयाचा उल्लेख केल्यामुळे मद्रास उच्च न्यायालयाच्या एका न्यायधीशांनी त्यांच्यावर न्यायालयाचा अवमान केल्याचा ठपका ठेवला आहे. गेल्या आठवड्यात ‘नीट’ परीक्षेची तयारी करणाऱ्या चार विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या.या घटनेचा संदर्भ देत सूर्या यांनी न्यायालयाविषयी मत मांडले. दरम्यान, सूर्या यांच्या वक्तव्याच्या चुकीच्या भाषांतरावर न्यायधीशांनी प्रतिक्रिया दिल्याचे म्हटले जात आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
न्यायधीश एस.एम. बालासुब्रमण्यम यांनी सूर्या यांचे वक्तव्य वादग्रस्त असल्याचे म्हटले आहे. सूर्या यांच्या मतांमुळे न्यायालयाचा अवमान झाला आहे. या वक्तव्यात त्यांनी केवळ न्यायधीशांची निष्ठा आणि श्रद्धा तसेच आपल्या देशाच्या महान न्याय व्यवस्थेलाच कमी लेखले नसून टीका देखील केली असल्याचे पत्रात म्हटले आहे. ही बाब न्यायव्यवस्थेवरचा जनतेचा असणारा विश्वास डळमळीत करणारी आहे, असे त्यांनी नमूद केले.
देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
काय म्हटले सूर्या यांनी मागील आठवड्यात ‘नीट’ परीक्षेच्या ताणामुळे तमिळनाडूत चार विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. यावर सूर्या यांनी विद्यार्थ्यांनी केलेल्या आत्महत्या दुर्देवी आणि मन हेलावणाऱ्या आहेत, असे म्हटले होते. कोरोना संसर्गामुळे न्यायालय सध्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून न्यायदानाची प्रक्रिया करत आहे. मात्र विद्यार्थ्यांना न घाबरता परीक्षा देण्याचा आदेश देत आहे. या वक्तव्याला न्यायधीशांनी आक्षेप घेतला आहे. न्यायधीशांनी म्हटले, की त्यांच्या मतावरून असे वाटते की, न्यायधीशांच्या जीवाला धोका आहे आहे आणि म्हणूनच व्हीसीद्वारे न्यायदानाची प्रक्रिया पार पाडली जात आहे. विद्यार्थ्यांना न घाबरता परीक्षा द्यावी, असा आदेश देण्याचा कोणताही अधिकार नाही, असा सूर वक्तव्यातून निघतो, असे सुब्रह्मण्यम यांनी म्हटले आहे. दरम्यान, माध्यमांना दिलेल्या प्रतीत सूर्या यांच्या वक्तव्याच्या वादग्रस्त भागाचे तमिळ भाषेतून केलेले भाषांतर चुकीचे असल्याचे बोलले जात आहे. अभिनेते सूर्या यांना त्यांच्या वक्तव्याबाबत सोशल मीडियावर #TNStandsWithSuriya असा ट्रेंड सुरू होता.
जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा