मॉन्सूनची अंदमानात हजेरी; हवामान विभागाचा अंदाज खरा ठरला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Monsoon

यंदा अंदमान आणि निकोबार बेटांवर मॉन्सून वेळेत दाखल झाला आहे. त्यामुळे १ जून रोजी तो केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे.

मॉन्सूनची अंदमानात हजेरी; हवामान विभागाचा अंदाज ठरला खरा

Monsoon Updates : पोर्ट ब्लेअर : गेल्या काही दिवसांपासून वातावरणातील बदलाचा सर्वांनीच अनुभव घेतला. अरबी समुद्रात घोंघावणाऱ्या तौक्ते चक्रीवादळाने (Tauktae Cyclone) केरळ, कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र, गुजरात या पश्चिम किनारपट्टीलगतच्या राज्यांना जोरदार तडाखा दिला. याच दरम्यान मॉन्सूनला (Monsoon) अनुकूल असे वातावरण तयार झाले होते. अखेर शुक्रवारी (ता.२१) नैर्ऋत्य मोसमी पावसाचे (मॉन्सून) अंदमानात आगमन झाले. पुढील ४८ तासांमध्ये अंदमानसह बंगालच्या उपसागराच्या आग्नेय, नैर्ऋत्य भागात मोसमी पावसाची प्रगती होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. (Southwest Monsoon arrives over Andaman and Nicobar islands declared by IMD)

हेही वाचा: आमची लस आमचा फोटो; मोदींचा चेहरा कशाला? ही राज्ये झाली आक्रमक

१ जूनला केरळमध्ये

यंदा अंदमान आणि निकोबार बेटांवर मॉन्सून वेळेत दाखल झाला आहे. त्यामुळे १ जून रोजी तो केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरात सध्या कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे अंदमान-निकोबार बेटे आणि बंगालच्या उपसागरात मॉन्सूनचा परिणाम दिसून येत आहे. केरळानंतर १० जूनपर्यंत तळकोकणात मॉन्सून दाखल होऊ शकतो. १५ ते २० जूनपर्यंत मॉन्सून महाराष्ट्रात हजेरी लावेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

हेही वाचा: Republic Day Violence: दिल्ली पोलिसांकडून आरोपपत्र

दरवर्षी १८ ते २० मे पर्यंत मॉन्सून अंदमानच्या बेटांवर हजेरी लावतो. यंदा २१ मे रोजी मॉन्सून अंदमानात दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता, तो खरा ठरला आहे. सध्या बंगालच्या उपसागरात यास नावाचे वादळ घोंगावत असल्याने त्याचा वाऱ्याच्या गतीवर परिणाम झाला. त्यामुळे शुक्रवारी मॉन्सूनने अंदमानात हजेरी लावली. २३ आणि २४ मे दरम्यान यास चक्रीवादळ बंगालच्या खाडीला धडकण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

पुण्यातही पावसाच्या सरी

अंदमानात मॉन्सूनने हजेरी लावताच पुणे आणि उपनगरातही पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. औंध, विद्यापीठ परिसर, सकाळ नगर, बाणेर रस्ता, पाषाण रस्ता भागात जोरदार पाऊस झाला. तर काही ठिकाणी हलक्या सरी बरसल्या.

देशभरातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

loading image
go to top