esakal | Republic Day violence : दिल्ली पोलिसांकडून आरोपपत्र
sakal

बोलून बातमी शोधा

Republic Day violence

दिल्ली पोलिसांनी प्रजासत्ताकदिनी झालेल्या हिंचाचारप्रकरणी आरोपपत्र दाखल केला आहे.

Republic Day Violence: दिल्ली पोलिसांकडून आरोपपत्र

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

नवी दिल्ली ( Republic Day violence case)- दिल्ली पोलिसांनी प्रजासत्ताकदिनी झालेल्या हिंचाचारप्रकरणी आरोपपत्र दाखल केला आहे. 26 जानेवारीला तीन कृषी कायद्यांविरोधात (farmers agitating against the three farm laws) दिल्लीत आंदोलन करणाऱ्या काही शेतकऱ्यांकडून हिंसाचार झाला होता. यादिवशी ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली होती. यावेळी शेतकऱ्यांनी लाल किल्ल्यापर्यंत धडक मारली, यादरम्यान पोलिस आणि शेतकऱ्यांमध्ये संघर्ष झाल्याचं पाहायला मिळालं. आंदोलनकर्त्यांनी लाल किल्ल्यावर धार्मिक झेंडा फडकावला होता. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी दिप सिद्धूला 9 फेब्रुवारीला अटक केली होती, त्यानेच हिंचासार भडकवला असं पोलिसांनी म्हटलं होतं. त्यानंतर 10 मार्चला गृहमंत्रालयाने संयुक्त किशान मोर्चावर किसान ट्रॅक्टर परेडमध्ये नियमांचे भंग झाल्याचा ठपका ठेवला होता (The Delhi Police has filed chargesheet in the Republic Day violence case)

वेगवेगळ्या व्यक्तींविरोधात 38 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दिल्ली पोलिसांनी आरोप केलाय की, ट्रॅक्टर रॅलीदरम्यान निर्धारित मार्गाचा वापर करण्यात आला नाही. ठरवून दिलेल्या मार्गापेक्षा वेगळ्या मार्गाने शेतकऱ्यांनी दिल्लीत प्रवेश केला, यावेळी बॅरीकेट तोडण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी दिल्लीतील अनेक भाग व्यापला, अनेक ठिकाणी पोलिसांवर हल्ले करण्यात आले. त्यानंतर आंलोदनकर्त्यांनी लाल किल्ला गाठला. याठिकाणी धार्मिक झेंडा फडकावण्यात आला. याप्रकरणी दीप सिद्धू मुख्य आरोपी आहे.

हेही वाचा: टि्वटरने संबित पात्रांच्या टि्वटला ठरवलं 'हेरा-फेरी मीडिया'

500 पेक्षा अधिक पोलिस जखमी

26 जानेवारीला हजारोंच्या संख्येने शेतकरी दिल्लीत धडकले. यावेळी आंदोलनकर्ते आणि पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये झडप झाली. अनेक आंदोलनकर्ते ट्रॅक्टर घेऊन लाल किल्ल्यापर्यंत पोहोचले. त्यांनी ऐतिहासिक स्मारकात प्रवेश केला आणि त्याठिकाणी धार्मिक झेंडा फडकावला. यावेळी झालेल्या संघर्षात 500 पेक्षा अधिक पोलिस कर्मचारी जखमी झाले होते, तर एका आंदोलनकर्त्याचा मृत्यू झाला होता.

हेही वाचा: ‘नारद’ भ्रष्टाचारप्रकरणी तृणमूलचे नेते नजरकैदेत

दिल्ली पोलिसांनी 37 शेतकरी नेत्यांविरोधात एफआयआर दाखल केला होता. यात राकेश टिकैत, योगेंद्र यादव, मेधा पाटकर, राजेंद्र सिंह, बुटा सिंह, दर्शन पाल यांचा समावेश होता. दिल्ली पोलिसांनी प्रजासत्ताक दिनाच्या हिंसाचाराप्रकरणी आतापर्यंत 152 जणांना अटक केली आहे. दिल्ली पोलिसांनी राजद्रोह 124A (sedition) आयपीसीअंतर्गत गुन्हा दाखल केला आणि दीप सिद्धू आणि लख्खा सिधानाला मुख्य आरोपी ठरवले आहे.

loading image
go to top