esakal | लाईव्ह गोळीबाराचा व्हिडिओ व्हायरल; दोघांचा मृत्यू...
sakal

बोलून बातमी शोधा

sp leader and his son shot dead live video viral  at uttar pradesh

लाईव्ह गोळीबाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, या घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. समाजवादी पक्षाचे नेते आणि त्यांच्या मुलाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.

लाईव्ह गोळीबाराचा व्हिडिओ व्हायरल; दोघांचा मृत्यू...

sakal_logo
By
वृत्तसंस्था

संभल (उत्तर प्रदेश) : लाईव्ह गोळीबाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, या घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. समाजवादी पक्षाचे नेते आणि त्यांच्या मुलाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. गोळीबार करणारे दोघेही फरार झाले असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

Video: इम्रान खान यांचा 'सेक्‍सुअल परफॉर्मन्स'...

समाजवादी पक्षाचे नेते छोटा लाल दिवाकर आणि त्याचा मुलगा सकाळी शेतात फिरण्यासाठी गेले असताना त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. शमशोई गावात ही घटना घडली. छोटा लाल दिवाकर हे चंदौसी या विधानसभा मतदार संघातील समाजवादी पक्षाचे माजी उमेदवार होते. गावात नरेगा योजनेंतर्गत बनवल्या जाण्याऱ्या रस्त्यावरून वाद सुरू होता. या वादातूनच गावातीलच दोघांनी त्यांची हत्या केल्याचा आरोप आहे. गोळीबाराची घटना घडल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. दोघांचे मृतदेह शवविच्छेदन अहवालासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. फरार झालेल्यांना पकडण्यासाठी पथके रवाना झाली आहेत.

छोटा लाल दिवाकर यांची पत्नी सरपंच आहे. नरेगा योजनेंतर्गत बनवल्या जाणाऱ्या रस्त्याला ते विरोध करत होते. त्यामुळे हा वाद झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. गावात भर दिवसा घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. शिवाय, गोळीबाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मनाने श्रीमंत असलेल्या भिकाऱयाची दानत मोठी...

loading image
go to top