
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा 'सेक्सुअल परफॉर्मन्स' काही खास नव्हता, असे त्यांची पहिली पत्नी रेहम खान यांनी सोशल मीडियावर सांगितले. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, पाकिस्तानमध्ये धुमाकूळ घालत आहे.
कराची (पाकिस्तान): पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा 'सेक्सुअल परफॉर्मन्स' काही खास नव्हता, असे त्यांची पहिली पत्नी रेहम खान यांनी सोशल मीडियावर सांगितले. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, पाकिस्तानमध्ये धुमाकूळ घालत आहे.
मास्क घालून धावत असताना फुटलं फुफ्फुस...
इम्रान खान आणि रेहम खान यांचा घटस्फोट झाला आहे. रेहम खान यांनी यापूर्वीही इम्रान खान हे समलैंगिक असल्याचा आरोप केला होता. पाकिस्तानी युट्युबला दिलेल्या मुलाखतीत रेहम खान यांनी इम्रान खान यांच्या लैंगिक क्षमतेवर विधान केले. पहिल्या पतीपेक्षा इम्रान खान यांचा 'सेक्सुअल परफॉर्मन्स' काही खास नव्हता, असे रेहम खान म्हणाल्या.
...अन् वर्गात मध्येच सुरू झाला अश्लिल व्हिडिओ
वकार जाका यांनी रेहम खान यांची मुलाखत घेतली. यावेळी इम्रान खान यांच्या लैंगिक क्षमतेबाबत प्रश्न विचारण्यात आल्यावर त्यांनी बिनधास्त उत्तरे दिली. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, पाकिस्तानमध्ये चर्चेला उधान आले आहे. पण, रेहम खान यांनी व्हिडिो एडिट केल्याचा आरोप करताना म्हणाल्या, 'माझी प्रतिमा मलिन करण्याचा हा प्रयत्न आहे. माझ्या पुस्तकात इम्रान खान यांच्याविरोधात एकही शब्द नाही. पुस्तकाच्या प्रसिद्धीसाठी हे सर्व काही सुरू आहे.'
दरम्यान, रेहम खान यांनी एका मुलाखतीत इम्रान खान समलैंगिक असल्याचा आरोप केला होता. इम्रान यांचे त्यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ पक्षातील अनेक लोकांशी संबंध असल्याचा डावक रेहम खान यांनी केला होता. पाकिस्तानी कलाकार हमजा अली अब्बासी आणि पीटीआय सदस्य मुराद सईद हे देखील समलैंगिक असून त्यांचे इम्रान खान सोबत संबंध असल्याचा आरोप तरेहम यांनी केला होता.