'संस्कृत बोला, म्हणजे डायबिटिस होणार नाही'; पाहा कोणी केला दावा!

टीम ई-सकाळ
शुक्रवार, 13 डिसेंबर 2019

मध्य प्रदेशच्या सतना लोकसभा मतदारसंघाचे गणेश सिंह प्रतिनिधित्व करतात. त्या मतदारसंघातून ते चार वेळा निवडून आले आहेत. फारसे चर्चेत नसणारे गणेश सिंह त्यांच्या सार्वजनिक कार्यक्रमातील धक्कादायक वक्तव्यामुळं चर्चेत आले आहेत.

नवी दिल्ली : भाजपचे एक खासदार त्यांच्या अजब वक्तव्यामुळं सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत.  तुम्ही संस्कृत बोलला तर, तुम्हाला डायबिटिस होणार नाही, असा दावा त्यांनी केलाय. त्याला त्यांनी एका संशोधनाची पुष्टीही दिलीय. त्यांच्या या अजब दाव्यामुळं भाजपची मात्र पंचाईत झालीय. सोशल मीडियावर त्यांना ट्रोल केलं जातंय.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

काय म्हणाले गणेश सिंह?
मध्य प्रदेशच्या सतना लोकसभा मतदारसंघाचे गणेश सिंह प्रतिनिधित्व करतात. त्या मतदारसंघातून ते चार वेळा निवडून आले आहेत. फारसे चर्चेत नसणारे गणेश सिंह त्यांच्या सार्वजनिक कार्यक्रमातील धक्कादायक वक्तव्यामुळं चर्चेत आले आहेत. गणेश सिंह यांनी दावा केला आहे की, तुम्ही जर, संस्कृत बोलत असला तर, तुम्ही डायबिटिस आणि कोलेस्ट्रॉलच्या संकटापासून वाचू शकता. संस्कृत विद्यापीठा संदर्भात सादर करण्यात येणाऱ्या विधेयकाविषयी माहिती देताना, त्यांनी हा दावा केला आहे. अमेरिकेतील एका संस्थेच्या संशोधनाचा हवालाही त्यांनी दिला आहे. अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था, नासाच्या हवाल्यानं  गणेश सिंह म्हणाले, 'जर कॉम्प्युटर प्रोग्रामिंग संस्कृतमध्ये करण्यात आलं तर ते खूप चागलं होईल. जगभरातील 97 टक्के भाषांचं मूळ संस्कृत आहे. त्यात इस्लामिक भाषांचाही समावेश आहे.' त्यांच्या या वक्तव्यावर सोशल मीडियावर त्यांची प्रचंड टर उडवली जात आहे. ट्रोलर्सनी त्यांना सांभाळून बोलण्याचा, विचार करून बोलण्याचा सल्ला दिला आहे. 

आणखी वाचा - मुंबईत मंत्रालयात आता होणार रोज कामकाज

खासदार लोकसभेत बोलतात संस्कृतमध्ये
भाजपचे खासदार प्रताप सारंगी हे लोकसभेमध्ये विधेयकांवर चर्चा करताना संस्कृतमध्येच बोलतात. ही भाषा खूप सोपी आहे. त्यातील वाक्यं अनेक प्रकारे बोलली जाऊ शकतात. तसेच इंग्रजी भाषेतील अनेक शब्द हे संस्कृतमधूनच घेण्यात आल्याचा दावा, प्रताप सारंगी यांनी केलाय. प्राचीन भाषेच्या प्रचार आणि प्रसार केल्यामुळं इतर भाषांवर कोणताही परिणाम होणार नाही, असा दावाही सारंगी यांनी केलाय. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: speak sanskrit and keep diabetes away says bjp mp ganesh singh