रेल्वेची खास सुविधा; आता स्टेशनवर बनवू शकता पॅन, आधार कार्ड | Sci-tech News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रेल्वेची खास सुविधा; आता स्टेशनवर बनवू शकता पॅन, आधार कार्ड

रेल्वेची खास सुविधा; आता स्टेशनवर बनवू शकता पॅन, आधार कार्ड

भारतीय रेल्वे (Indian Railway) प्रवाशांना वेळोवेळी विविध सुविधा पुरवण्यासाठी नेहमी तत्पर असते. दरम्यान, आता रेल्वे स्थानकांवर ((Railway Stations) एक नवीन सुविधा सुरू केली जाईल. प्रवाशांना आता स्थानकांवरच पॅन कार्ड (PAN Card) आणि आधार कार्ड (Aadhar Card) मिळणार आहे.

200 स्थानकांवर सुविधा

या सुविधेसाठी स्थानकावर किऑस्क उभारण्यात येत आहेत. त्यांना 'रेल्वे साथी कियोस्क' (Railwire Sathi Kiosk) असे नाव देण्यात आले आहे. सध्या 200 रेल्वे स्थानकांवर ही सुविधा उपलब्ध असेल. जर प्रवासी ट्रेनची वाट पाहत असतील किंवा कोणीतरी येण्याची वाट पाहत असतील तर ते या किऑस्कवर जाऊन आधार किंवा पॅन कार्ड बनवू शकतात.

2 स्टेशनवर सुरू झाली सुविधा

एवढेच नव्हे तर या स्थानकांवर, प्रवाशांना फोन रिचार्ज आणि विजबील भरण्याची सुविधा देखील मिळणार आहे. सध्या उत्तर-पूर्व रेल्वेच्या (North Eastern Railway)2स्थानकांवर ही सुविधा सुरू झाली आहे. तसेच, इतर स्टेशनवर ही सुविधा लवकरच मिळणे सुरू होईल.

स्थानके चिन्हांकित करणे

Railtel द्वारे देशभरातील 200 रेल्वे स्थानकांवर कॉमन सर्व्हिस सेंटर किऑस्क उभारले जात आहेत. पहिल्या टप्प्यात वाराणसी शहर आणि प्रयागराज रामबाग येथे किऑस्क उभारण्यात आले आहेत. दुसऱ्या टप्प्यात इतर प्रमुख स्थानकांवर ही सुविधा सुरू करण्यात येत आहे. त्यासाठी स्थानके चिन्हांकित करण्यात येत आहेत.

इतर सुविधाही उपलब्ध असतील

या किऑस्कवर कर भरण्याची सुविधाही उपलब्ध असेल. या सोबतच ट्रेन, फ्लाइट आणि बसचे तिकीटही बुक करता येणार आहे. तेथे तुम्हाला बँकिंग, विमा आणि इतर अनेक सुविधा मिळतील.

CSC वर होतील छोटी सरकारी काम

स्थानिक पातळीवर लहान सरकारी काम हाताळण्यासाठी सरकारने कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) उघडण्यास सुरुवात केली आहे. यासाठी शासनाकडून परवाना आवश्यक आहे. ही अशी ठिकाणे आहेत जिथे वीजबिल, फोन बिल, फोन रिचार्ज, विमा, आधार आणि पॅन कार्ड बनवले जातात.

टॅग्स :PANmaharashtra railways