निवडणुका असलेल्या राज्यातील लसीकरण वाढवा; निवडणूक आयोगाचे आदेश

उत्तराखंड आणि गोव्यात पहिल्या डोस घेणाऱ्याची संख्या शंभर टक्क्यांच्या जवळपास आहे.
election commission
election commissionFILE PHOTO

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने (Election Commission of India) केंद्राला निवडणुका असणाऱ्या राज्यांमध्ये लसीकरणाचा वेग वाढवण्याचा आदेश दिला आहे. निवडणुका असणाऱ्या राज्यांमध्ये सर्वांचं लवकरात लवकर लसीकरण झालेलं असावं हे ध्येय आहे अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. सोमवारी झालेल्या बैठकीत केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण (Union health secretary Rajesh Bhushan) यांनी निवडणूक आयोगाला मतदान होणार असणाऱ्या प्रत्येक राज्यातील लसीकरणाबाबतची माहिती दिली. दरम्यान, पाच राज्यांत होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुका पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता नसल्याची माहिती निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी दिली आहे. (Speed Up Covid 19 Vaccination In poll bound states says Election Commission of India)

election commission
मुलांचं लसीकरण, बूस्टर डोसबाबत केंद्राकडून नियमावली जाहीर

2022 च्या पहिल्या तिमाहीत, गोवा, मणिपूर, उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि पंजाब या पाच राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. कोविड-19 च्या रूग्णांमध्ये झालेली वाढ आणि ओमिक्रॉनमुळे निर्माण झालेल्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर, पाच राज्यांमध्ये निवडणुका आणि रॅली आयोजित करण्याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. ज्या राज्यांमध्ये लसीकरणाचे प्रमाण कमी आहे, तेथे निवडणूक आयोगाने (Election Commission) आरोग्य मंत्रालयाला (Health Ministry Of India) लसीकरण प्रक्रिया जलद करण्यास सांगितले आहे, जेणेकरून अधिकाधिक लोकसंख्येचे लवकरात लवकर लसीकरण केले जाईल. उत्तराखंड आणि गोव्यात पहिल्या डोस घेणाऱ्याची संख्या शंभर टक्क्यांच्या जवळपास आहे, तर उत्तर प्रदेशमध्ये ते 85 टक्के आणि मणिपूर आणि पंजाबमध्ये सुमारे 80 टक्के आहे. (Assembly Election 2022 In Five States of India)

election commission
Omicron Updates : देशात सर्वाधित रूग्ण दिल्लीत; महाराष्ट्राचा नंबर दुसरा

निवडणुका पुढे ढकल्याची केली होती विनंती

न्यायमूर्ती शेखर यादव यांच्या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सरकार आणि निवडणूक आयोगाला विधानसभेच्या निवडणुका एक किंवा दोन महिन्यांनी पुढे ढकलण्याचा आणि देशातील कोविड परिस्थितीमुळे सर्व राजकीय रॅलींवर बंदी घालण्याचा विचार करण्याची विनंती केली होती. याबाबत मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्र यांना विचारले असता, आयोग लवकरच उत्तर प्रदेशचा दौरा करणार असून, परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर योग्य तो निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com