विमान हवेत असताना केबिनमधून निघाला धूर- व्हिडिओ व्हायरल | SpiceJet Aircraft Smoke In Cabin | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 SpiceJet Aircraft Makes Emergency Landing At Delhi Airport After Crew Notices Smoke In Cabin

विमान हवेत असताना केबिनमधून निघाला धूर- व्हिडिओ व्हायरल

दिल्लीहून जबलपूरला जाणारे स्पाइसजेटचे विमान सकाळी काही वेळाने परत दिल्ली विमानतळावर आले. विमान टेक ऑफ केल्यानंतर 5000 फूट उंचीवर पोहोचले तेव्हा पायलटच्या केबिनमध्ये अचानक धूर निघायला लागला. विमानाच्या केबिनमधून धूर निघत असल्याचे पाहून पायलटने इमर्जन्सी लँडिंग केले. (SpiceJet Aircraft Makes Emergency Landing At Delhi Airport After Crew Notices Smoke In Cabin)

एएनआय या वृत्तसंस्थेने जारी केलेल्या व्हिडिओमध्ये विमानात धूर दिसत आहे. धुरामुळे आत बसलेल्या प्रवाशांना प्रचंड त्रास होत आहे. यानंतर विमान दिल्ली विमानतळावर सुरक्षितपणे उतरवण्यात आले आहे. विमानातून प्रवाशांना सुखरूप उतरवण्यात आले आहे. प्रवाशांना दुसऱ्या विमानाने जबलपूरला पाठवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Web Title: Spicejet Aircraft Makes Emergency Landing At Delhi Airport After Crew Notices Smoke In Cabin

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..