दुर्गापूर विमान अपघात! दोन प्रवासी ICU मध्ये, DGCA करणार चौकशी

मुंबई ते दुर्गापूरला जाणाऱ्या विमानाला लँडिंग करताना खराब हवामानाचा सामना करावा लागला होता.
SpiceJet
SpiceJetSakal

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील दुर्गापूर विमानतळावर स्पाईस जेट ()Spice Jet विमानाच्या लँडिंग दरम्यान रविवारी झालेल्या घटनेतील दोन प्रवाशांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने सोमवारी जारी केलेल्या नोटमध्ये देण्यात आली आहे. स्पाईसजेटच्या मुंबई-दुर्गापूर विमानाला रविवारी विमानतळावर लँडिंग करताना खराब वातावरणामुळे अडचणींचा सामना करावा लागला होता. यामध्ये विमानातील 15 प्रवाशी जखमी झाले होते. (Durgapur Flight Accident)

SpiceJet
इलॉन मस्ककडून ट्वीटरच्या नव्या सीईओची निवड; पराग अग्रवालांचं काय होणार?

मुंबई-दुर्गापूर विमान लँडिंगदरम्यान झालेल्या अपघातादरम्यान जखमी झालेल्या प्रवाशांपैकी दोन प्रवाशांना दुर्गापूर येथील रूग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. यातील एका प्रवाशाच्या डोक्याला दुखापत झाली असून, त्यांना शहरातील डायमंड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे, तर दुसऱ्याला प्रवाशाला मिशन हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे.

घटनेनंतर चौकशी सुरू

दरम्यान, विमानाच्या या घटनेनंतर आता या प्रकरणाची DGCA कडून चौकशी केली जाणार आहे. यासाठी एक तपास पथक तयार करण्यात आले आहे. दरम्यान स्पाईस जेटने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात सांगितले की, मुंबई ते दुर्गापूरला जाणाऱ्या बोईंग B737 SG-945 विमानाला लँडिंग करताना खराब हवामानाचा सामना करावा लागला. यामध्ये दुर्दैवाने काही प्रवाशी जखमी झाले असून याबद्दल कंपनीने दु:ख व्यक्त केले आहे. तसेच जखमींना शक्य ती सर्व मदत करण्याचे आश्वासनही दिले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com