
इलॉन मस्ककडून ट्वीटरच्या नव्या सीईओची निवड; पराग अग्रवालांचं काय होणार?
इलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटरसाठी (Tweeter) नवीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची (CEO) निवड केली असल्याची माहिती समोर आली असून, ट्विटरची 44 अब्ज डॉलरमध्ये विक्री पूर्ण झाल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी पराग अग्रवालची (Parag Agrawal) जागा घेणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान, या पदासाठी निवड करण्यात आलेल्या व्यक्तीचे ना सांगण्यास मस्क यांनी नकार दिला आहे. रॉयटर्सने सुत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. (Elon Musk Has New Twitter CEO Lined Up)
हेही वाचा: हार्दिक पटेलांच्या ट्विटर बायोतून 'कॉंग्रेस' गायब, चर्चांना उधाण
दरम्यान, गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये जॅक डॉर्सी यांच्य जागी पराग अग्रवाल यांची ट्विटरचे नवे सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर आता अग्रवाल यांना कंपनीने 12 महिन्यांपूर्वीच पदावरून खाडून टाकल्यास त्यांना 42 दशलक्ष डॉलर्स मिळतील असा अंदाज रिसर्च फर्म इक्विलरने व्यक्त केला आहे.
व्यवस्थापनावर विश्वास नाही
कंपनीच्या व्यवस्थापनावर आपला अजिबात विश्वास नसल्याचे मस्क यांनी गेल्या महिन्यात ट्विटरचे अध्यक्ष ब्रेट टेलर यांना सांगितले होते. तसेच सिक्युरिटी एक्स्चेंज कमिशन मध्येही मस्क यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली होती.
हेही वाचा: 'साधी विकास सोसायटी काढली नाही…'; अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला
दरम्यान मस्क यांनी ट्विटरची सूत्रे हाती घेतल्यानंतर MightyApp चे संस्थापक सुहेल यांनी ट्विट केले होते. यामध्ये त्यांनी आपल्याला अग्रवाल यांच्यासाठी खूप दुःख होत असल्याचे म्हणत त्यांच्याकडे अनेक योजना होत्या. परंतु, आता अग्रवाल आणि त्यांच्या टीमला अनिश्चिततेत जगावे लागणार असल्याचे म्हटले होते. सुहेल यांच्या या ट्वीटरला उत्तर देताना आभार मानले होते. तसेच ही सेवा आहे आणि त्यामध्ये सतत सुधारणा करण्यात येते आणि हे काम मी केले जेणेकरून ट्विटर सुधारू शकेन असे म्हटले होते.
Web Title: Elon Musk Has New Twitter Ceo Lined Up To Replace Parag Agrawal
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..