

Big Revelation in Sports Sector: Bindra Task Force Submits Detailed Reform Report
sakal
नवी दिल्ली: क्रीडा मंत्रालयाने स्थापन केलेल्या अभिनव बिंद्रा यांच्या नेतृत्वाखालील टास्क फोर्सने (कृती दल) भारताच्या क्रीडा प्रशासनातील कार्यपद्धतीमधील उणिवा अधोरेखित केल्या आहेत. यात प्रशासकांचे अर्धवट ज्ञान आणि अपुरे प्रशिक्षण असल्याचे नमूद केले. यात सुधारणा करणायासाठी ‘आयएएस’ अधिकाऱ्यांचाही समावेश असलेली स्वायत्त संस्थेची स्थापना करण्याची शिफारस केली आहे.