
नवी दिल्ली : पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या किमान अकरा जणांना तपास यंत्रणांनी तीन राज्यांतून मागील काही दिवसांत अटक केली आहे. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर विविध पातळ्यांवर तपास सुरू असताना युट्यूबर ज्योती मल्होत्राला पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा ‘आयएसआय’साठी हेरगिरी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. याप्रकरणानंतर तपास यंत्रणा अधिक सावध झाल्या असून देशभरात झडती सत्र सुरू आहे.