

Srinagar Blast
esakal
दिल्लीतील घटनेनंतर आता जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगर हादरली. नौगाम पोलिस स्टेशनच्या आवारात शुक्रवारी रात्री ११:३० वाजता जोरदार स्फोट झाला. या दुर्घटनेत नऊ जण ठार झाले, तर २९ जण गंभीर जखमी झाले. जखमींमध्ये पोलिस कर्मचारी, फॉरेन्सिक तज्ज्ञ आणि स्थानिक नागरिकांचा समावेश आहे. स्फोटाचा धक्का इतका प्रचंड होता की, परिसरातील वाहने भस्मसात झाली आणि घरांच्या काचा फुटल्या. घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, त्यात आग आणि धुराचे लोट दिसत आहेत.