esakal | सुशांतच्या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या बदनामीचं षड्यंत्र; 80 हजार फेक अकाउंटचा वापर
sakal

बोलून बातमी शोधा

parambir singh

ही मुद्दामहून चालवली गेलेली मोहिम होती जेणेकरून मुंबई पोलिसांची प्रतिमा आणि चालू तपास दोन्हींचीही बदनामी व्हावी.

सुशांतच्या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या बदनामीचं षड्यंत्र; 80 हजार फेक अकाउंटचा वापर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर राजकारण चांगलेच तापले होते. त्याची हत्या की आत्महत्या या गरमागरम चर्चेला आता एम्सच्या (AIIMS) डॉक्टरांच्या मेडीकल रिपोर्टमुळे पुर्णविराम मिळाला आहे. मात्र, असं असलं तरीही या प्रकरणी मुंबई पोलिसांना जाणिवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला अशी चर्चा होती. आणि आता या चर्चेला आधार मिळावा अशी एक माहिती समोर आली आहे. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर मुंबई पोलिस आणि महाराष्ट्र सरकारची बदनामी करण्यासाठी सोशल मिडीयावर जवळपास 80 हजार फेक अकाऊंट उघडले गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.  

मुंबई पोलिसांच्या सायबर सेल युनिटने एक रिपोर्ट बनवला आहे. धक्कादायक बाब अशी आहे की, हे अकाऊंट भारतातले नाहीयत तर परदेशातील आहेत. या रिपोर्टमध्ये म्हटलंय की, विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर इटली, जपान, पोलंड, स्लोवेनिया, इंडोनेशिया, तुर्की, थायलंड, रोमानिया, फ्रान्स अशा देशातून पोस्ट केल्या गेल्या आहेत. 

हेही वाचा - हाथरसप्रकरणी उत्तराखंड काँग्रेसचा सत्याग्रह; देशभरात योगी सरकारविरोधात निषेध आणि आंदोलनं

एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांनी म्हटलंय की, आम्ही विदेशी भाषातील पोस्ट शोधून काढल्या आहेत. या पोस्टमध्ये #justiceforsushant #sushantsinghrajput आणि #SSR हे हॅशटॅग  वापरले गेलेत. आम्ही आणखी काही फेक अकाऊंट शोधण्याच्या प्रयत्नात आहोत. 

हेही वाचा - हाथरस - मथुरेत PFI च्या 4 कार्यकर्त्यांना अटक; दंगलीच्या कटाचा आरोप

मुंबई पोलिस कमिश्नर परमबीर सिंह यांनी म्हटलं की, हे कँपेन अशा वेळेला चालवलं गेलंय की, जेव्हा कोरोना व्हायरसमुळे 84 पोलिस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता आणि जवळपास 6 हजारहून अधिक कर्मचारी व्हायरसने संक्रमित होते. ही मुद्दामहून चालवली गेलेली मोहिम होती जेणेकरून मुंबई पोलिसांची प्रतिमा आणि चालू तपास दोन्हींचीही बदनामी व्हावी. मुंबई पोलिसांना असभ्य अशा भाषेत बदनाम करणारे अकाऊंट्स फेक असून ते  जाणीवपूर्वक बनवले गेले. आमची सायबर सेल या प्रकरणी सविस्तर तपास करत आहे. ज्यांनी या प्रकारे कायद्याचं उल्लंघन केलं आहे त्यांच्यावर इन्फोर्मेशन टेक्नोलॉजी ऍक्ट अंतर्गत कारवाई करण्यात येईल. 
 

loading image