
चेन्नई : ‘‘भाषिक समानतेची मागणी करणे हा वर्चस्ववाद नाही, खरे वर्चस्ववादी तर ते आहेत जे हिंदी बाबत अतिरेकी आग्रह धरतात आणि हिंदी वर्चस्ववाद बाळगतात. त्यांना असे वाटते की त्यांचा भाषिक वर्चस्ववाद हा त्यांचा हक्क आहे आणि त्याला विरोध म्हणजे देशद्रोह,’’ असे मत तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी गुरुवारी समाज माध्यमातून व्यक्त केले.