

Stampede at Venkateswara Temple During Ekadashi Leaves 9 Devotees Dead Rescue On
Esakal
आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यात असलेल्या व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात भीषण चेंगराचेंगरीची घटना घडलीय. यात मोठ्या जिवीत हानीची भीती व्यक्त करण्यात येतेय. अनेक भाविकांचा मृत्यू झाला असून जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. एकादशीच्या निमित्तानं मंदिरात भाविकांची गर्दी उसळली होती. यामुळे ही घटना घडल्याचं सांगण्यात येतंय. चेंगराचेंगरीत ९ जणांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येतं. मात्र अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.