
चेन्नईः तामिळनाडूतल्या करुर येथे एका निवडणूक रॅलीदरम्यान मोठी दुर्घटना घडली आहे. तमिळ चित्रपटातील स्टार अभिनेता आणि टीव्हीकेचे प्रमुख विजय थलापती याच्या रॅलीमध्ये चेंगराचेंगरी झाली आहे. या दुर्घटनेमध्ये दहा जणांचा मृत्यू झाल्याचा दावा मंत्री एम. सुब्रमण्यम यांनी केला आहे. तर ३० पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत.