मेट्रो विस्तारीकरणाचा दुसरा टप्पा सुरू करा - गिरीश बापट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Girish Bapat
मेट्रो विस्तारीकरणाचा दुसरा टप्पा सुरू करा - गिरीश बापट

मेट्रो विस्तारीकरणाचा दुसरा टप्पा सुरू करा - गिरीश बापट

नवी दिल्ली - पुणे (Pune) आणि परिसराचे झपाट्याने होणारे शहरीकरण, (Urbanization) तसेच रोजगारासाठी (Employment) अन्य जिल्ह्यांतून पुण्यात होणाऱ्या स्थलांतराचा ताण शहरातील पायाभूत सुविधांवर (Facility) होत आहे. शहरातील वाहतुकीची (Transport) स्थिती चिंताजनक होत असल्याने पुणेकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा देण्यासाठी पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातील ८२.५ किलोमीटर विस्तारीकरणाचे काम तातडीने सुरू करावे, असा मुद्दा भारतीय जनता पक्षाचे खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांनी लोकसभेत मांडला.

केंद्र सरकारचे महत्त्वाच्या मुद्द्यांकडे लक्ष वेधण्यासाठी लोकसभेच्या खासदारांना मिळालेले नियम ३७७ हे संसदीय आयुध आहे. या अंतर्गत खासदार बापट यांनी हा मुद्दा मांडला. महाराष्ट्र मेट्रोने फेज २ साठी सर्वेक्षण आणि नियोजन सुरू केले आहे, असे निदर्शनास आणून दिले. सध्याच्या ३३.१ किमी मेट्रो मार्गांचे काम लवकरच पूर्ण होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच दुसऱ्या टप्प्यातील ८२.५ किमी लांबीचे मार्गाचा विस्तार करण्यासाठी अहवाल (डीपीआर) तातडीने करण्याची गरज असल्याचे नमूद केले.

दुसऱ्या टप्प्यातील विस्तारीकरणात वनाज ते चांदणी चौक (१.५ किमी), रामवाडी ते वाघोली (१२ किमी), हडपसर ते खराडी (५ कि.मी.), स्वारगेट ते हडपसर (७ किमी), खडकवासला ते स्वारगेट (१३ किमी) आणि एसएनडीटी ते वारजे (८ किमी) तसेच पीसीएमसी ते निगडी ४.४१ किमी आणि स्वारगेट ते कात्रज ५.४६ किलोमीटरचा सर्वेक्षण अहवाल मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठवण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.

प्रकल्पांना मंजुरी देऊन काम जलद गतीने सुरू करा

पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचे काम जलद गतीने सुरू करण्याची गरज आहे. यातून वाहतूक कोंडीची चिंताजनक परिस्थिती कमी करण्यासाठी मदत होईल. म्हणूनच पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातील सर्व प्रकल्पांना मंजुरी देऊन त्याचे काम जलद गतीने सुरू करण्यासाठी कार्यवाही करावी, अशी विनंती गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्री यांना केल्याचे बापट यांनी म्हटले आहे.

Web Title: Start The Second Phase Of Metro Expansion Girish Bapat

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Girish BapatpuneMetro
go to top