esakal | उद्योगस्नेही टॉप टेन राज्यात महाराष्ट्र नाहीच; शेजारी राज्य पहिल्या क्रमांकावर
sakal

बोलून बातमी शोधा

Nirmala-Sitharaman

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने उद्योगस्नेही राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांची क्रमवारी प्रसिद्ध केली असून त्यामध्ये आंध्रप्रदेशने पहिला क्रमांक कायम ठेवला असून उत्तरप्रदेशने दुसरा आणि तेलंगणने तिसरा क्रमांक मिळवला आहे. महाराष्ट्र मात्र या यादीमध्ये तेराव्या स्थानी आहे. पहिल्या दहा राज्यांमध्ये देखील महाराष्ट्राला स्थान मिळू शकले नाही.

उद्योगस्नेही टॉप टेन राज्यात महाराष्ट्र नाहीच; शेजारी राज्य पहिल्या क्रमांकावर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली - केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने उद्योगस्नेही राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांची क्रमवारी प्रसिद्ध केली असून त्यामध्ये आंध्रप्रदेशने पहिला क्रमांक कायम ठेवला असून उत्तरप्रदेशने दुसरा आणि तेलंगणने तिसरा क्रमांक मिळवला आहे. महाराष्ट्र मात्र या यादीमध्ये तेराव्या स्थानी आहे. पहिल्या दहा राज्यांमध्ये देखील महाराष्ट्राला स्थान मिळू शकले नाही.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

केंद्रशासित प्रदेशांमध्ये दिल्लीने पहिले स्थान पटकावले आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाकडून राज्यांतील उद्योग सुधारणा कृती आराखडा क्रमवारी आज प्रसिद्ध करण्यात आली. या यादीमुळे राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये उद्योगस्नेही वातावरण तयार होईल, असा विश्वासही अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केला आहे.

बांधकाम परवाना, मजुरांचे नियमन, पर्यावरणीय नोंदणी, जमिनीची उपलब्धता आणि एक खिडकी योजन आदी निकषांच्या आधारे राज्ये व केंद्रशासित प्रदेशांची क्रमवारी जाहीर केली जाते. गेल्या वर्षीही या यादीत आंध्र प्रदेशने पहिले स्थान मिळविले होते तर तेलंगण, हरियाणा अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर होते. या क्रमवारीत गेल्या वर्षी तिसऱ्या क्रमांकावर असलेले हरियाना आता १६ व्या स्थानावर घसरले आहे. मध्य प्रदेश चौथ्या, झारखंड पाचव्या, छत्तीसगड सहाव्या, हिमाचल प्रदेश सातव्या, राजस्थान आठव्या, पश्चिम बंगाल नवव्या तर गुजरात दहाव्या स्थानावर आहे.

Breaking : रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय; १२ सप्टेंबरपासून धावणार विशेष रेल्वेगाड्या!

विभागानुसार उत्तर भारतात उत्तर प्रदेशने बाजी मारली आहे. तर दक्षिण भारतात आंध्र प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे. पूर्व भारतात पश्चिम बंगाल तर ईशान्य भारतात आसाम आघाडीवर आहे. केद्र शासित प्रदेशांपैकी दिल्लीत उद्योगासाठी चांगलं वातावरण असल्याचं मंत्रालयाने म्हटलं आहे.