
नवी दिल्ली : ‘‘सट्टेबाजी आणि जुगार यांचे नियमन हे राज्य सरकारचा विषय असल्याने त्यावर कारवाई करण्याचा अधिकार राज्य सरकारांकडे आहे,’’ असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी लोकसभेत केले. ऑनलाइन गेमिंग संकेतस्थळांवर बंदी घालण्याच्या मुद्द्यावरून लोकसभेत बुधवारी जोरदार खडाजंगी झाली.