esakal | सर्व जनतेने घेतला पहिला डोस; 'या' राज्यांनी मिळवला पहिला मान
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Vaccination

सर्व जनतेने घेतला पहिला डोस; 'या' राज्यांनी मिळवला पहिला मान

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली : भारतात सध्या कोरोनाचं संकट आहे. या संकटाशी सामना करण्यासाठी सध्या फक्त लसीकरण हे एकच शस्त्र उपलब्ध आहे. भारतात आपत्कालीन वापरासाठी म्हणून आतापर्यंत सहा लशींना मंजूरी मिळाली आहे. यामध्ये सीरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड, भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन, रशियाची स्पुटनिक व्ही, अमेरिकेची मॉडर्ना आणि जॉन्सन जॉन्सनच्या सिंगल डोस असलेल्या लसीला परवानगी दिली आहे. दरम्यान, भारतातील अनेक राज्यांनी तसेच केंद्र शासित प्रदेशांनी लसीकरणासाठी पात्र असलेल्या 100 टक्के लोकसंख्येला पहिला डोस देण्याचा पहिला मान मिळवला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविय यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.

हेही वाचा: योगींच्या जाहिरातीत कोलकत्याचा उड्डाणपुल; तृणमूलचा आक्षेप

गोवा, हिमाचल प्रदेश, लडाख, सिक्कीम, लक्षद्वीप, दादरा आणि नगर हवेली आणि दमन आणि दीव या सहा राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशांमध्ये लशीचा पहिला डोस १०० टक्के पात्र लोकसंख्येला देण्यात आला आहे. हिमाचल प्रदेश हे राज्य देशातील पहिलं असं राज्य ठरलं आहे, ज्याने आपल्या लसीकरणासाठी पात्र असलेल्या संपूर्ण लोकसंख्येला कोरोना प्रतिबंधक लशीचा पहिला डोस दिला आहे.

यामध्ये दादरा, नगर हवेली आणि दमन-दीवमध्ये आतापर्यंत ६.२६ लाख डोस देण्यात आले आहेत. गोव्यामध्ये आतापर्यंत ११.८३ लाख डोस तर हिमाचल प्रदेशमध्ये ५५.७४ लाख डोस देण्यात आले आहेत. त्याखालोखाल लडाखमध्ये १.९७ लाख तर लक्षद्वीपमध्ये ५३,४९९ डोस देण्यात आले आहेत. तर सिक्कीममध्ये ५.१० लाख डोस देण्यात आले आहेत.

loading image
go to top