छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा बसविणार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

अतिक्रमणविरोधात कारवाई करीत असताना छिंदवाडा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा जेसीबीच्या साह्याने चुकीच्या पद्धतीने हटविल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद उमटल्यावर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी शिवरायांचा पुतळा पुन्हा बसविण्याचे आदेश दिले आहेत. 

भोपाळ - अतिक्रमणविरोधात कारवाई करीत असताना छिंदवाडा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा जेसीबीच्या साह्याने चुकीच्या पद्धतीने हटविल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद उमटल्यावर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी शिवरायांचा पुतळा पुन्हा बसविण्याचे आदेश दिले आहेत. 

Video : जेसीबीच्या साहाय्याने हटवली छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती; शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट!

छिंदवाडा येथे अतिक्रमण हटविण्याची मोहीम सुरू असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जेसीबीच्या साह्याने हटविण्यात आला. अशा पद्धतीने शिवाजी महाराजांचा पुतळा हटविल्याने शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली होती. याप्रकरणाची तत्काळ दखल घेत योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री कमलनाथ यांनी दिले होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The statue of Chhatrapati Shivaji Maharaj will be restored