Shivaji Maharaj Statue
Shivaji Maharaj StatueEsakal

Shivaji Maharaj Statue: कर्नाटकातला शिवरायांचा पुतळा तातडीनं बसवा अन्यथा महाराष्ट्रात.. भाजप नेत्याचा काँग्रेसला कडक इशारा

कर्नाटक सरकारची मुजोरी शिवरायांचा पुतळा हटवल्याने तीव्र संताप
Published on

कर्नाटकच्या बागलकोट चौकातून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थानिक प्रशासनाने हटवला आहे. यामुळे शिवप्रेमींमध्ये संताप निर्माण झाला आहे. गुरूवारी रात्री जेसीबी लावून कडक बंदोबस्तात हा पुतळा हटवण्यात आला आहे. हा पुतळा परवानगीशिवाय स्थापन केल्याचा आरेप स्थानिक प्रशासनाने केला आहे. कर्नाटक सरकारने पुतळा हटवल्याने स्थानिक पातळीवर संताप व्यक्त केला जात आहे. याचे पडसाद महाराष्ट्रात उमटण्यास सुरूवात झाली आहे.(Latest Marathi News)

भाजप नेते आमदार नितेश राणे यांची प्रतिक्रिया

तर याच प्रकरणावर भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी कर्नाटकातील काँग्रेस सरकारला इशारा दिला आहे. शिवाजी महाराजांचा पुतळा तातडीने बसवा अन्यथा काँग्रेस नेत्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशारा नितेश राणे यांनी काँग्रेस सरकारला दिला आहे.(Latest Marathi News)

Shivaji Maharaj Statue
Uddhav Thackrey: उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! ३५ वर्षापासून नगरसेवक असलेल्या नेत्याने पक्षाला ठोकला रामराम

शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांची प्रतिक्रिया

दरम्यान या संदर्भात बोलताना शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, जर सरकारने तो पुतळा हटवला असेल तर ती दुर्दैवी बाब आहे. त्याचे प्रायश्तित त्या सरकारला भोगावे लागेल, असे भरत गोगावले यांनी म्हटलं आहे.(Latest Marathi News)

Shivaji Maharaj Statue
"कुलगुरूंचा फोन रात्रीपासून बंद, मुख्यमंत्री निवडणुकांना घाबरतात", आदित्य ठाकरेंचे दोन गंभीर आरोप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com