"कुलगुरूंचा फोन रात्रीपासून बंद, मुख्यमंत्री निवडणुकांना घाबरतात", आदित्य ठाकरेंचे दोन गंभीर आरोप

Mumbai University Election
Mumbai University Election
Updated on

Mumbai University Election: मुंबई विद्यापीठाने सिनेट निवडणुका स्थगित केल्या आहेत. दरम्यान ठाकरे गट आक्रमक झाला आहे. आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी सरकारने निवडणुका रद्द केल्याने दोन गंभीर आरोप केले. तसेच शासन आपल्या दारी, निवडणूक घ्यायला घाबरी, अशी टीका सरकारवर केली. 

आदित्य ठाकरे म्हणाले, 2010 मध्ये युवासेना सिनेट लढली तेव्हा 10 पैकी 8 जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर 2017 मध्ये त्यानंतर 10 पैकी 10 जागा जिंकलो. प्रत्येक पक्ष निवडणूकीत विरोधात होता. तरी देखील आम्ही निवडणूक जिंकलो होतो. (mumbai latest news)

मात्र निवडणूक रद्द करण्यामागे कारण काय? नेमकं असं काय झालं की एका रात्रीत निवडणूक स्थगित झाली बैठकीनुसार निर्णय झाला असे पत्रकात म्हटले आहे. ही बैठक कुठे झाली आहे, कुणाच्या घरी बैठक झाली, मिनट्स आहेत का?. चान्सलर, व्हाईस चान्सलर काल रात्रीपासून फोन बंद करून बसले आहेत, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

मणिपूर सारखी परिस्थिती मुंबईत नाही आहे. सव्वालाख मतदारांनी नोंदणी केली आहे. तरी देखील निवडणूक रद्द करण्यात आली, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

आदित्य ठाकरे म्हणाले, निवडणूक आज स्थगित झाली असेल तर ही निवडणूक कधी होणार?. कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर देशात कोणतीही निवडणूक रद्द होत नाही. मग मुंबईत असं काय झाल? अधिकारी निवडणूक का घेऊ शकत नाहीत. सव्वालाख मतदारांनी 20-20 रुपये देऊन नोंदणी केली आहे. 95 हजारापर्यंत मतदारांची यादी आली आहे. सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन देखील निवडणुका रद्द करण्यात आल्या.

Mumbai University Election
Ajit Pawar: पालकमंत्री पदावरून नाराजी? मुख्यमंत्र्यांच्या डिनर पार्टीला अजित पवारांच्या गैरहजेरी मागे कारण काय

पहिली गोष्ट एकनाथ शिंदे डरपोक मुख्यमंत्री आहेत. म्हणून त्यांनी भाजपमध्ये उडी मारली नाहीतर केंद्रीय यंत्रणांनी त्यांना अटक केली असती. त्यांच्यावर ईडीची कारवाई झाली होती. त्यांचा निवडणुका रद्द करण्यात दबाव होता का? कारण ते निवडणुकांना घाबरतात, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.

आदित्य ठाकरे म्हणाले, दुसरी गोष्ट म्हणजे नेमणूक करून कारभार चालवायचा आहे. नियुक्ती करायची आणि आपल्या सोयीने काम करून घ्यायचं. शिक्षक मतदारसंघाची निवडणूक झाली त्यात त्यांचा पराभव झाला म्हणून शिंदे घाबरतात. महाशक्ती सोबत असून देखील ते घाबरतात. भविष्यात लोकसभेसाठी देखील असंच होऊ शकते. सिनेटर्स तुमचे सरकार पाडणार नाही. तुम्हाला आम्ही पाडणार आहोत.

आशिष शेलार यांनी युवासेनेनी नोंदणी बोगस केल्याचा आरोप केला होता. यावर आदित्य ठाकरे म्हणाले, "बेगाने शादी में अब्दुला दिवाना. त्यांना प्रेमाची गरज आहे, मी ते देतो, भाजपमध्ये त्यांना ते मिळत नाही"

शासन आपल्या दारी, निवडणूक घ्यायला घाबरी. या सरकारला युवासेना शिवसेना पाडणार, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला आहे.

Mumbai University Election
Eknath Shinde : मुख्यमंत्र्याऐवजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली सद्भावना दिवस प्रतिज्ञा, 'हे' आहे कारण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com