
बनावट औषधं, नमुन्यासाठी आणि नशेसाठीच्या औषधांचा काळाबाजार ही आरोग्याच्या दृष्टीने घातक बाब आहे. अनेक ठिकाणी अशा बनावट औषधांचा सुळसुळाट आहे. अन्न आणि औषध प्रशासनाकडून यावर सातत्यानं छापे टाकले जातात. पण आता एका छाप्यावेळी चक्क व्यापाऱ्याने छापा टाकणाऱ्या टीमला एक कोटींच्या लाचेची ऑफर दिल्याची घटना समोर आलीय. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, पहिल्यांदाच कोणत्याही स्पेशल फोर्सला एक कोटींची अशी लाच दिली गेली असावी. एक कोटी देऊनही अधिकारी तयार होत नसल्याचं पाहून दोन कोटींची ऑफरही व्यापाऱ्याने दिली होती. उत्तर प्रदेशातील आग्र्यात ही घटना समोर आलीय.