वंदे भारत एक्स्प्रेसवर दगडफेक; PM मोदींनी आईच्या निधनादिवशीच केलं होतं रेल्वेचं उद्घाटन I Malda Railway | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vande Bharat Express

ज्या दिवशी मोदींनी ट्रेनचं उद्घाटन केलं, त्याच दिवशी त्यांच्या आई हिराबेन यांचं निधन झालं होतं.

Malda Railway : वंदे भारत एक्स्प्रेसवर दगडफेक; PM मोदींनी आईच्या निधनादिवशीच केलं होतं रेल्वेचं उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालमधील हावडा (West Bengal Howrah) इथं देशातील सातव्या वंदे भारत एक्सप्रेसचं (Vande Bharat Express) उद्घाटन केलं होतं. या सेमी हायस्पीड ट्रेनच्या उद्घाटनानंतर अवघ्या चार दिवसांनी दगडफेक करण्यात आलीये.

ज्या दिवशी पंतप्रधान मोदींनी ट्रेनचं उद्घाटन केलं, त्याच दिवशी त्यांच्या आई हिराबेन यांचं निधन झालं होतं. अंत्यसंस्काराच्या कार्यक्रमानंतर ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कार्यक्रमात सहभागी झाले होते.

हेही वाचा: Siddheshwar Swami : चालता बोलता 'देव' गेला! सिद्धेश्वर स्वामींचं निधन; PM मोदींनी वाहिली श्रद्धांजली

पश्चिम बंगालमधील हावडाजवळील मालदा स्थानकात (Malda Railway Station) ही घटना घडलीये. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, हावडा ते न्यू जलपाईगुडीला जोडणारी वंदे भारत एक्स्प्रेस सुरू झाल्यानंतर अवघ्या 4 दिवसांनी दगडफेक करण्यात आलीये. दगडफेकीमुळं रेल्वेचं मोठं नुकसान झालंय. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पंतप्रधान मोदींनी 30 डिसेंबर रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हावडा ते न्यू जलपाईगुडीपर्यंत धावणाऱ्या देशातील सातव्या वंदे भारत एक्सप्रेसचं उद्घाटन केलं होतं. याचं दिवशी पंतप्रधान मोदींच्या आईचं निधन झालं होतं.