जगभरात Article 370 चा मुद्दा उपस्थित करणं बंद करा : रवीश कुमार

वृत्तसंस्था
Friday, 9 August 2019

पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय स्तरावर हा मुद्दा उपस्थित केला, तर तिथेसुद्धा आम्ही त्यांना उत्तर देऊ.

- रवीश कुमार, प्रवक्ते, परराष्ट्र मंत्रालय

नवी दिल्ली : केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरातील कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तानकडून सातत्याने भारताविरोधात भूमिका घेतली जात आहे. त्यानंतर आता याच मुद्यावरून भारताचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी पाकिस्तानला खडेबोल सुनावत जगभरात Article 370 चा मुद्दा उपस्थित करणे बंद करा, असे सांगितले. 

रवीश कुमार म्हणाले, जगासमोर भारताने स्वतःचा पक्ष ठेवला आहे. आम्ही जो निर्णय घेतला आहे, तो आमचा अंतर्गत विषय आहे. पाकिस्तान सैरभैर झाल्यामुळेच अशा प्रकारची पावले उचलत आहे. पाकिस्तानने हवाई हद्द बंद करण्याचा जो निर्णय घेतला आहे, असे जे काही निर्णय घेत आहे. त्याचा पुनर्विचार करण्याचा आम्ही सल्ला दिला आहे. 

दरम्यान, पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय स्तरावर हा मुद्दा उपस्थित केला, तर तिथेसुद्धा आम्ही त्यांना उत्तर देऊ, असेही रवीश कुमार यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Stop presenting Article 370 issue says Ravish Kumar