भाजपच्या स्थापनेमागेही नेहरूच! मंत्रिमंडळातल्या एका राजीनाम्याने झालेली जनसंघाची सुरुवात

६ एप्रिल १९८० रोजी भाजपची स्थापना झाली होती. त्याआधी जनसंघ हा पक्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा म्हणून ओळखला जात होता. जनता पार्टीतून जनसंघ बाहेर पडल्यानंतर भाजप ही नवी ओळख पक्षाला मिळाली होती.
How BJP Was Formed in 1980

How BJP Was Formed in 1980

Esakal

Updated on

केंद्रासह देशातील बहुतांश राज्यांमध्ये सत्तेत असलेल्या भाजपचा आज स्थापना दिवस आहे. ६ एप्रिल १९८० रोजी भाजपची स्थापना झाली होती. त्याआधी जनसंघ हा पक्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा म्हणून ओळखला जात होता. त्याच जनसंघाचं विलिनीकरण १९७७मध्ये जनता पार्टीत झालं आणि पुढे मतभेदानंतर १९८०मध्ये जनता पार्टीतून जनसंघ बाहेर पडला. तेव्हा नाव भारतीय जनता पार्टी असं ठेवलं. भाजपचे पहिले राष्ट्रीय अध्यक्ष अटल बिहारी वाजपेयी बनले होते. ते १९८६ पर्यंत या पदावर होते. जनता पार्टीच्या भूमिकेमुळेच भाजपची स्थापना झाली. जो जनता पार्टीचा सदस्य असेल त्याला राष्ट्रीय स्वंयसेवक संघाशी संबंध ठेवता येणार नाहीत असं जनता पार्टीने म्हटलं होतं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com