k4 missile testing
sakal
विशाखापट्टण - देशाच्या सागरी संरक्षणाच्या सामर्थ्यामध्ये मोठी भर पडली असून आण्विक पाणबुडीवरून आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची नुकतीच यशस्वी चाचणी घेण्यात आली. बंगालच्या खाडीमध्ये मंगळवारी ‘आयएनएस अरीघात’ या आण्विक पाणबुडीवरून ‘के-४’ हे क्षेपणास्त्र डागण्यात आले. विशाखापट्टणच्या किनाऱ्यावर ही चाचणी घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. समुद्रतळाशी राहून शत्रूच्या जहाजांचा वेध घेण्याचे नौदलाचे सामर्थ्य यामुळे वाढेल.