
बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी "पॉक्सो' कायद्यात कठोर शिक्षेची तरतूद करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने आज घेतला.
नवी दिल्ली : बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी "पॉक्सो' कायद्यात कठोर शिक्षेची तरतूद करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने आज घेतला. यात अशा गुन्ह्यांविरुद्ध मृत्युदंडाची शिक्षा ठोठावण्याची दुरुस्ती या कायद्यात केली जाणार असून, त्याबाबतच्या विधेयकाला आज मान्यता देण्यात आली.
यासोबत, बालकांचे विकृत चित्रीकरण करणाऱ्यांना आर्थिक दंड आणि तुरुंगवासाच्या शिक्षेचीही तरतूद यात करण्यात आली आहे. यासोबतच ट्रान्सजेंडर यांना स्वतंत्र श्रेणीची मान्यता देणाऱ्या विधेयकालाही आज हिरवा कंदील दाखविण्यात आला आहे. या विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाल्यानंतर तृतीयपंथीयांचा सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक उत्थानाचा मार्ग मोकळा होईल, असा सरकारतर्फे दावा करण्यात आला आहे.