वर्गात पोहोचताच १३ वर्षीय विद्यार्थी खाली कोसळला, जागीच मृत्यू; आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा, कुटुंबावर दु:खाचा डोंगर

Student Death In School मुलाला शाळेत सोडून परतत असताना घरी पोहोचण्याआधीच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती वडिलांना फोनवर समजली. एकुलत्या एक मुलाच्या अशा मृत्यूने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
13-Year-Old Student Dies After Collapsing in School Classroom

13-Year-Old Student Dies After Collapsing in School Classroom

Esakal

Updated on: 

दिल्लीत एका ९ वर्षीय मुलीचा अचानक मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना लखनऊमध्येही अशीच घटना घडलीय. शाळेत गेलेल्या १३ वर्षीय विद्यार्थ्याचा अचानक मृत्यू झाला. लखनऊच्या जानकीपूरम भागात ही घटना घडली. अथर्व प्रेम सिंह असं मृत्यू झालेल्या आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचं नाव आहे. शाळेत वर्गात पोहोचताच तो अचानक खाली कोसळला. यानंतर त्याला तातडीनं रुग्णालयात नेण्यात आलं. पण उपचाराआधीच मृत्यू झाला.

Loading content, please wait...