Student Falls to Death After Birthday Celebration : इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून कोसळल्याने एका २९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. ५ जानेवारी रोजी बंगळुरुच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या वसतीगृहात ही घटना घडली. निलय कैलाशभाई पटेल असं या तरुणाचं नाव असून तो मुळचा गुजरातचा असल्याची माहिती आहे. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. वाढदिवस साजरा केल्यानंतर काही तासांत ही घटना घडल्याने हळहळ व्यक्त केली जाते आहे.