UP Crime: दिल्लीतून अपहरण बाघपतमध्ये हत्या; मृत तरुणाबरोबर काय घडले? थरकाप उडवणारे प्रकरण समोर

Delhi Crime: तरुणाचे दिल्लीतून अपहरण करून त्याला बागपत येथे आणल्यानंतर शेजाऱ्यांनी त्याची हत्या केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
Delhi  Crime
Delhi CrimeEsakal

उत्तर प्रदेशच्या बाघपतमध्ये दिल्लीतील एका विद्यार्थ्याची हत्या झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. तरुणाचे दिल्लीतून अपहरण करून त्याला बागपत येथे आणल्यानंतर शेजाऱ्यांनी त्याची हत्या केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

तरूण हिमांशू शर्मा याला बेदम मारहाण केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेत प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

ही घटना कोतवाली भागातील पाबला गावात घडली. जिथे हिमांशू शर्मा नावाच्या बीएच्या विद्यार्थ्याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला. कुटुंबीयांनी दिल्लीतील शेजाऱ्यांवर ही हत्या केल्याचा आरोप केला आहे.

मृताचा नातेवाईक असलेल्या अनिल यांनी समुद्र अजय आणि पवनवर अपहरण आणि हत्येचा आरोप केला आहे. अनिलने सांगितले की, बागपतच्या पाबला गावात तीन शेजाऱ्यांनी मिळून आधी हिमांशू शर्माचे अपहरण केले आणि नंतर बेदम मारहाण केली.

खून करणाऱ्या आरोपींना अटक करण्याची मागणी करत मृताच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यातही गोंधळ घातला. सध्या कुटुंबीयांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

Delhi  Crime
Video: अशा खोटारड्या लोकांना शिक्षा झालीच पाहिजे; 'हिंसक हिंदू' वक्तव्याप्रकरणी शंकराचार्यांचे राहुल गांधींना समर्थन

हिमांशू शर्मा या मुलाची हत्या केल्याचा आरोप असलेल्या कुटुंबाने दावा केला आहे की, तरुणाने त्याने त्यांच्या 19 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला होता आणि तो तिला सतत ब्लॅकमेल करत होता. पण आरोपींनी केलेला हा दावा मृत मुलाच्या आईने आरोप फेटाळून लावला आहे.

20 वर्षीय मुलाची आई रजनी शर्मा म्हणाल्या, "हे सर्व आरोप खोटे आहेत. या प्रकरणात कोणत्याही मुलीचा सहभाग नव्हता."

मृत मुलाचे काका अनिल कुमार शर्मा पुढे म्हणाले, "शनिवारी हिमांशूला मुलीच्या फोनवरून फोन आला. तो घरून निघाला तेव्हा ओरीपींच्या कुटुंबातील चार ते पाच सदस्यांनी त्याला बागपतला पळवून नेले आणि मारले."

Delhi  Crime
Rahul Gandhi: "राहुल गांधींना संसदेत बंद करून कानशिलात मारायला हवी होती", भाजप आमदाराचे वादग्रस्त वक्तव्य

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com