बोलत नाही म्हणून दिल्लीत विद्यार्थिनीवर गोळ्या झाडल्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

student of class 11 was shot for not speaking social media crime news delhi

बोलत नाही म्हणून दिल्लीत विद्यार्थिनीवर गोळ्या झाडल्या

नवी दिल्ली : बोलत नाही म्हणून अकरावीतील विद्यार्थिनीवर गोळ्या झाडण्यात आल्याची धक्कादायक घटना राजधानीत घडली आहे. २५ ऑगस्ट रोजी दक्षिण दिल्लीतील संगम विहार परिसरात हा प्रकार घडला. याप्रकरणी पोलिसांनी अमानत अलीला अटक केली आहे. विद्यार्थिनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आरोपीच्या संपर्कात होती. नंतर तिने आरोपीशी बोलणे बंद केले होते.

आरोपीने चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितले की, विद्यार्थिनीने माझ्याशी बोलणे बंद केल्याने मी तिची हत्या करण्याचा कट रचला व साथीदार बॉबी आणि पवन यांच्याशी संपर्क साधला. घटनेच्या वेळी पीडित मुलगी महाविद्यालयातून घरी परतत होती. आरोपीने तिला वाटेत अडवून गोळ्या झाडून पळ काढला. गंभीर जखमी विद्यार्थिनीवर उपचार सुरू आहेत.

विद्यार्थिनी तिच्या भावासह केंब्रिज इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकते. त्यादिवशी दुपारी ती आई आणि लहान भावासह शाळेतून परतत होती. ती घरा समोर आली तेव्हाच दोन तरुण पायी आले आणि त्यांनी मागून तिच्यावर गोळ्या झाडल्या. मुलगी तिथेच पडली. काही अंतरावर उभ्या असलेल्या मोटारसायकलवरून आरोपी पळून गेले. लोकांनी याची माहिती पोलिसांना दिली.

Web Title: Student Of Class 11 Was Shot For Not Speaking Social Media Crime News Delhi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..