West Bengal | विद्यार्थ्यांना लागलं फ्लेवर्ड कंडोमचं व्यसन; वापरण्याचं नव्हे तर... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Condoms
विद्यार्थ्यांना लागलं फ्लेवर्ड कंडोमचं व्यसन; वापरण्याचं नव्हे तर...

विद्यार्थ्यांना लागलं फ्लेवर्ड कंडोमचं व्यसन; वापरण्याचं नव्हे तर...

पश्चिम बंगालमधल्या काही विद्यार्थ्यांना चक्क कंडोम वापरण्याची सवय लागलीये. नाही नाही, शारिरीक संबंध करताना नव्हे, तर नशा करण्यासाठी. या कंडोमचा नशा जवळपास १० ते १२ तास टिकतो.

पश्चिम बंगालमधल्या दुर्गापूर भागात फ्लेवर्ड कंडोमच्या विक्रीत अचानक मोठी वाढ झाली. दुकानदारांमध्ये याबाबत चर्चा झाल्यानंतर कळलं की यापूर्वी दिवसाला कंडोमचे तीन ते चार पॅकेट्स विकले जायचे. पण आता विक्री इतकी वाढली की दिवसभरात स्टॉकच संपतोय. त्यानंतर लक्षात आलं की, हे फ्लेवर्ड कंडोम्स विद्यार्थ्यांकडून खरेदी केले जातात. ते गरम पाण्यात भिजवत ठेवले जातात. त्यानंतर त्यातून बाहेर पडणाऱ्या केमिकल्समुळे नशा चढते.

मनी कंट्रोल या वृत्तसंस्थेनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. विद्यार्थ्यांना हल्ली कफ सिरप, सॅनिटायझर, आफ्टरशेव्ह लोशन, ग्लू, पेंट, नेलपेंट, व्हाईटनर अशा सहज उपलब्ध होणाऱ्या वस्तूंची नशा लागली आहे. अशाच प्रकारच्या घटना हैद्राबादमध्येही आढळून आल्या आहेत. त्यावर हैद्राबाद पोलिसांनी सांगितलं की, अशा विषयांमध्ये गुन्हा नोंदवता येत नाही. कारण याबद्दलची तरतूद कायद्यामध्ये नाही. पश्चिम बंगालच्या पोलिसांनी मात्र अद्याप यावर भाष्य केलेलं नाही.

Web Title: Students In West Bengal Get Addicted To Flavoured Condoms To Get High

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :West Bengal