Eco-centric studies : अभ्यास होणार पर्यावरणकेंद्री अन् मनोरंजक;विद्यार्थ्यांना दप्तराविना पटणार जगाची ओळख

विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तरांचे आणि डोईवरील अभ्यासाचे ओझे कमी करण्यासाठी ‘नॅशनल कौन्सिल फॉर एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग’ने (एनसीईआरटी) तयार केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचा शिक्षण मंत्रालयाने आज आढावा घेतला.
Environmental studies
Environmental studiessakal

नवी दिल्ली : विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तरांचे आणि डोईवरील अभ्यासाचे ओझे कमी करण्यासाठी ‘नॅशनल कौन्सिल फॉर एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग’ने (एनसीईआरटी) तयार केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचा शिक्षण मंत्रालयाने आज आढावा घेतला. विद्यार्थ्यांना आता ‘बॅगलेस डे’च्या काळामध्ये स्थानिक पर्यावरण आणि लोककला प्रकारांची माहिती करून दिली जाणार आहे. यामुळे त्यांच्या सामान्य ज्ञानात आणखी भर पडेल असे अभ्यासकांचे म्हणणे आहे.

‘एनसीईआरटी’ च्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये आणखी सुटसुटीतपणा आणण्यात येईल. ‘एनसीईआरटी’शी संबंधित ‘पीएसएस सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ व्होकॅशनल एज्युकेशन’ने शाळांमध्ये दप्तराशिवाय दिवस (बॅगलेस डे) या संकल्पनेची अंमलबजावणी करण्यासाठी तसेच रोजचा अभ्यास आनंदी होण्यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे निश्चित केली आहेत. विद्यार्थ्यांना स्थानिक पर्यावरण आणि परिसंस्थेची माहिती करून देण्याबरोबरच त्यांना शुद्ध पेयजलाचे महत्त्व पटवून देणे, स्थानिक प्राणी आणि वनस्पतींच्या प्रजातींची ओळख करून देणे तसेच स्थानिक स्मारकांना भेटी देऊन विद्यार्थ्यांना त्यांची माहिती करून देणे अशा अनेकविध सूचना करण्यात आल्या आहेत. या सूचनांवर सखोल विचारमंथन करून त्यामध्ये अधिक सुटसुटीतपणा आणण्यावर भर दिला जाईल असे शिक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी)-२०२०’ अन्वये इयत्ता सहावी ते आठवीदरम्यानच्या विद्यार्थ्यांना दहा दिवसांसाठी बॅगलेस डेमध्ये सामावून घेण्यात यावे अशी सूचना करण्यात आली आहे.

अहवाल लिहावा लागणार

स्थानिक ऐतिहासिक, सांस्कृतिक पर्यटनस्थळांची विद्यार्थ्यांना ओळख व्हावी तसेच त्यांना स्थानिक कलाकारांसोबत संवाद साधण्याची संधी मिळावी म्हणून त्यांना प्रोत्साहन देण्यात येईल. जिल्हा आणि तालुक्याच्या पातळीवर असणाऱ्या विविध शैक्षणिक संस्थांची त्यांना ओळख करून देण्यात येईल. विविध स्थळांना भेटी दिल्यानंतर विद्यार्थ्यांना अहवाल लेखन देखील करावे लागेल.

क्रीडा स्पर्धांसाठी प्रोत्साहन

दप्तरांशिवायचे जे दिवस असतील त्या काळामध्ये विद्यार्थ्यांना काही नवी कौशल्ये शिकायला मिळतील. पारंपरिक चौकटीबाहेरचे वैशिष्ट्यपूर्ण असे शिक्षण त्यांना मिळेल. विद्यार्थ्यांचा व्यापक अर्थाने कौशल्य विकास व्हावा असा उद्देश त्यामागे होता. विविध कलाप्रकारांबरोबर क्रीडा स्पर्धांमध्येही विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे म्हणून त्यांना प्रोत्साहन देण्यात यावे अशी शिफारस करण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com