'मोदी सरकारला चीनकडून अपमानित व्हायला आवडते, त्याची सवय झालीय'| Subramanian Swamy | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Narendra Modi
'मोदी सरकारला चीनकडून अपमानित व्हायला आवडते, त्याची सवय झालीय?'

'मोदी सरकारला चीनकडून अपमानित व्हायला आवडते, त्याची सवय झालीय'

नवी दिल्ली : चीनशी सीमा वादाबाबत भारताच्या धोरणावर सतत टीका करणारे भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामीने पुन्हा एकदा मोदी सरकारला (Modi Government) फटकारले आहे. स्वामी म्हणाले, की सरकारला चीनकडून अपमानित व्हायला आवडत असून त्याची त्यांना सवय झाली आहे. एका बातमीनुसार या आठवड्यात सीमावादावर चीन आणि भारत दरम्यान बैठक होऊ शकते. यावरुन स्वामी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. स्वामी (Subramanian Swamy) ट्विटमध्ये म्हणतात, की मोदी सरकारला चीनकडून अपमानित व्हायची सवय लागली आहे. त्यातून ते आनंद घेत आहेत? चीनकडून आपली जमीन हडपल्यानंतर १९९३ मध्ये भारताच्या कोणत्याही प्रदेशावर एकमेकांची सहमती बनली होती का? तेथे बोलण्यास काय आहे ? एक वेळेस असे होऊ शकते. मात्र चीनद्वारे आतापर्यंत सर्व बैठकीत अपमानच मिळत आहे. (India China Relation)

हेही वाचा: कंगनाने केले पाकिस्तानचे कौतुक; ट्विट होतोय व्हायरल

यापूर्वीही स्वामी यांनी अफगाणिस्तानवर झालेल्या बैठक चीनशी जोडून सरकारवर हल्लाबोल केला होता. तेव्हा स्वामी म्हणाले होते, की मुख्य मुद्दा भारतीय प्रदेशावर चीनकडून होत असलेली घुसखोरी आहे. १८ वेळेस बैठका होऊनही तोडगा निघालेला नाही. यामुळे मोदी सरकारला आता केवळ एकाच गोष्टीवर लक्ष द्यायचे आहे, की आपल्या प्रदेशातून चीनला बाहेर काढणे.

loading image
go to top