esakal | कंगनाने केले पाकिस्तानचे कौतुक; ट्विट व्हायरल

बोलून बातमी शोधा

Kangana Ranaut

नुकतच कंगनाचे एक ट्विट व्हायरल होत आहे. या ट्विटमध्ये कंगनाने चक्क पाकिस्तानच कौतुक केले आहे.

कंगनाने केले पाकिस्तानचे कौतुक; ट्विट होतोय व्हायरल
sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

मुंबई : बॅलिवूडमध्ये कोन्ट्रवर्सि क्विन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे कंगना राणावत. सोशल मीडियावरील बोल्ड वक्तव्यांमुळे कंगना नेहमी चर्चेत असते. अनेक वेळा तिला सोशल मीडियावर ट्रोल केले जाते. बॉलिवूड असो वा राजकारण कंगना प्रत्येक विषयावर तिचे मत सोशल मीडियावर मांडते. नुकतच कंगनाचे एक ट्विट व्हायरल होत आहे. या ट्विटमध्ये कंगनाने चक्क पाकिस्तानच कौतुक केले आहे.

देश सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहेत. सध्या ट्विटरवर #PakistanStandsWithIndia हा हॅशटॅग ट्रेण्ड होत आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी शेजारचा देश पाकिस्तान आपल्या देशाला मदत करण्यासाठी पुढे येत आहेत. त्यामुळे हा हॅशटॅग पाकिस्तानमध्ये ट्रेण्ड होत आहे. यावर प्रतिक्रिया देत कंगनाने ट्विट केले, ‘पाकिस्तानच्या ट्विटरवर टॉप ट्रेंड होणार हॅशटॅग #PakistanstandswithIndia पाहून आनंद झाला. भारताचे वीर पुरूष मोदींनी दिलेल्या लसीचे त्यांनी कौतुक केले, या कठीण काळात आम्ही त्यांच्या सहानुभूतीचा आदर करतो.’ या ट्विटमधून कंगनाने पाकिस्तानची स्तुती केल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.

लवकरच कंगनाचा ‘थलायवी’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस योणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या चित्रपटातील ‘चली चली’ हे गाणे सध्या खूप गाजत आहे. या चित्रपटात कंगना तामिळनाडूच्या दिवंगत माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या भूमिकेत दिसणार आहे. यानंतर कंगना ‘तेजस’ आणि ‘धाकड’ या दोन चित्रपटांमध्ये दिसेल.