
सुब्रमण्यम स्वामींचा PM वर हल्ला; ट्विटरवर मोदी व माझ्यात फरक एवढाच की...
मोदी सरकारच्या (narendra modi) धोरणांवर अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी (Subramanian Swamy) यांनी सोशल मीडियावर ट्विट करून पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. पीएम मोदींजवळ आंधळेभक्त कर्मचारी आहेत. जे पैशांच्या बदल्यात माझ्या विरोधात अपमानास्पद ट्विट करतात. मी स्वतः ट्विट करतो, असे त्यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे. (Subramanian Swamy attack on narendra modi)
ट्विटरवर मोदी आणि माझ्यात फरक असा आहे की, त्यांनी हिरेन जोशी सारख्या आंधळ्याभक्ताला पैसे देऊन मला आणि माझ्या कुटुंबाचा सर्वाधिक अपशब्द बोलण्यासाठी नियुक्त केले आहे. तर मी स्वतः ट्विट (tweet) करतो आणि स्वतःला एका वर्तुळात मर्यादित करतो. हे दोन्ही बाजूंनी थांबवायला हवे नाही तर हा ट्रेंड असाच चालू राहील, असे २३ मे रोजी माजी राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी (Subramanian Swamy) यांनी ट्विटमध्ये लिहिले.
सुब्रमण्यम स्वामी काही वर्षांपासून भाजपच्या आयटी सेलकडून त्यांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप करीत आहेत. २०२१ च्या सुरुवातीला देखील स्वामी म्हणाले होते की, भाजपचा आयटी सेल त्यांना बनावट आयडीद्वारे लक्ष्य करीत आहे. याबाबत त्यांनी पीएम मोदींकडे (narendra modi) तक्रारही केली. परंतु, हे चक्र सुरूच राहिले. आरोपानुसार भाजप समर्थक त्यांना ट्विटरवर टार्गेट करीत आहेत आणि त्यांना स्वामी (Subramanian Swamy) प्रत्युत्तर देत असतात.
हेही वाचा: प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे वादग्रस्त विधान; बलात्कार पीडितेबद्दल म्हणाल्या...
मोदी सरकारच्या धोरणांवर टीका
सुब्रमण्यम स्वामी अनेकदा मोदी सरकारच्या धोरणांवर टीका करतात. अशा स्थितीत भाजप आयटी सेल त्यांना निशाण्यावर घेत आहे. २० मे रोजी स्वामींनी आपल्या ट्विटमध्ये भाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था आणि चीन सीमा वादावर टोमणा मारला होता. भाजप २०२४ च्या इंडिया शायनिंग हॉलच्या दिशेने वाटचाल करीत आहे. अर्थव्यवस्थेत मोठे अपयश आले आहे. यासोबतच चीनने आपला चार हजार चौरस किमी भूभाग ताब्यात घेतला आहे. यावर विश्वास ठेवण्यास केंद्र सरकार नकार देत आहे. चीनच्या कारवायांवर स्वामी अनेकदा मोदी सरकारवर निशाणा साधत आहेत.
...तर चर्चेच्या अनेक फेऱ्या का झाल्या?
भारताच्या हद्दीत कोणीतरी घुसले हे केंद्र सरकार मान्य करायला तयार नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. जर कोणी आले नाही, तर भारत आणि चीनमध्ये लष्करी पातळीवर चर्चेच्या अनेक फेऱ्या का झाल्या?, असे सुब्रमण्यम स्वामी (Subramanian Swamy) यांचे म्हणणे आहे.
Web Title: Subramanian Swamy Narendra Modi Tweet War
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..