
नवी दिल्ली : उत्तर भारतात काही ठिकाणी पावसाचा जोर गुरुवारी ओसरला. उत्तराखंड, जम्मू - काश्मीर येथे पावसाने उसंत घेतली असली तरी नद्यांची पातळी अजूनही धोक्याचीच आहे. दुसरीकडे हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे रावी नदीला अचानक पूर आल्याने कांगडा जिल्ह्यातील बडा बंगाल गावातील अनेक सरकारी इमारती वाहून गेल्या आहेत.