कुटुंबाने लावला गळफास; पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू, मुलीची प्रकृती चिंताजनक

suicide attempt Death of child along with husband and wife, condition of daughter is critical
suicide attempt Death of child along with husband and wife, condition of daughter is criticalsuicide attempt Death of child along with husband and wife, condition of daughter is critical

मध्य प्रदेश : भिंड जिल्ह्यातील गोहड भागात एका कुटुंबाने गळफास लावून आत्महत्या (suicide) करण्याचा प्रयत्न केला. गळफास घेतल्यानंतर पती, पत्नी आणि एका मुलाचा मृत्यू झाला. तर मुलीची प्रकृती चिंताजनक आहे. गोहडपासून तीन किमी अंतरावर असलेल्या काठमा गावात ही घटना घडली. कुटुंबाने एवढे मोठे पाऊल का उचलले याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काठमा गावात राहणारे धर्मेंद्र गुर्जर यांनी पत्नी आणि दोन निष्पाप मुलांसह गळफास लावलाय यामध्ये धर्मेंद्र, पत्नी अमरेश आणि ११ वर्षांचा मुलगा प्रशांत यांचा मृत्यू (Death) झाला. स्थानिक लोकांच्या मदतीने नऊ वर्षीय निष्पाप मुलगी मीनाक्षीचे प्राण वाचले. मात्र, तिची प्रकृती चिंताजनक आहे. तिला प्राथमिक उपचारानंतर ग्वाल्हेरला रेफर करण्यात आले आहे.

suicide attempt Death of child along with husband and wife, condition of daughter is critical
सरकार किमान चालवून तरी दाखवा, देवेंद्र फडणवीसांचा टोला

धर्मेंद्र आणि त्याचे कुटुंब नेहमी सकाळी सहा वाजता उठायचे. शनिवारी सकाळी बराच वेळ होऊनही घराचा दरवाजा न उघडल्याने शेजाऱ्यांनी आश्चर्य व्यक्त करीत दरवाजा ठोठावला. मात्र, तरीही आतून आवाज आला नाही. लक्षपूर्वक ऐकल्यावर आतून मुलीच्या रडण्याचा आवाज येत होता. यानंतर शेजाऱ्यांनी तात्काळ पोलिसांना बोलावले.

मुलीच्या मानेवर फासाच्या खुणा

माहिती मिळताच काही मिनिटांत पोलिसही घटनास्थळी पोहोचले आणि दरवाजा उघडला. धर्मेंद्र गुर्जर, पत्नी अमरेश हे घराच्या खोलीत लटकले होते. ११ वर्षांचा मोठा मुलगा प्रशांत जमिनीवर पडला होता. तिघांचा मृत्यू (Death) झाला होता. खोलीतच जमिनीवर पडलेल्या मीनाक्षी हिच्या मानेवर फासाच्या खुणा होत्या. स्थानिक लोकांच्या मदतीने पोलिसांनी मुलीला तात्काळ गोहाड रुग्णालयात पाठवले आणि प्राथमिक उपचारानंतर तिला ग्वाल्हेरला रेफर करण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com