बेळगावातील सर्मथनगरात एकाची आत्महत्या

अमृत वेताळ
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

बेळगाव - समर्थनगर येथील सार्वजनिक विहिरीत उडी घेऊन एका व्यक्तीने आत्महत्या केली असल्याची घटना आज मंगळवारी (ता. 7) सकाळी उघडकीस आली. सदानंद लक्षमन सोनार उर्फ काकतीकर (रा. पहिला क्रॉस समर्थनगर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तो दोन दिवसांपासून घरातून बेपत्ता होता. ​

बेळगाव - समर्थनगर येथील सार्वजनिक विहिरीत उडी घेऊन एका व्यक्तीने आत्महत्या केली असल्याची घटना आज मंगळवारी (ता. 7) सकाळी उघडकीस आली. सदानंद लक्षमन सोनार उर्फ काकतीकर (रा. पहिला क्रॉस समर्थनगर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तो दोन दिवसांपासून घरातून बेपत्ता होता.

सदानंद हा रविवारी (ता. 5) घरातून बेपत्ता झाला होता. त्यामुळे घरच्यांनी त्याचा शोध सुरु केला होता. समर्थनगर येथील सार्वजनिक विहिरीत आज सकाळी एक मृतदेह तरंगताना काहींच्या निदर्शनास आला. ही बातमी परिसरात समजताच घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली. त्यानंतर मार्केट पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मृतदेह स्थानिक नागरिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आला. त्यावेळी तो मृतदेह सदानंद याचा असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी मार्केट पोलिसात आत्महत्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे काम सूरु आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: suicide incidence in Belgaum Samarthnagar