Kota News: 'कोटा'मध्ये विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचं प्रमाण चिंताजनक; तुमच्या मुलांमधील 'या' लक्षणांकडे करु नका दुर्लक्ष

रविवारी ४ तासांत दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या करण्याच्या घटना घडल्या आहेत.
Kota
Kota sakal

IIT/JEE Prepration Center : आयआयटी आणि एनईईटीच्या तयारीसाठी प्रसिद्ध असलेल्या कोटामध्ये या वर्षी आतापर्यंत २४ विद्यार्थ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचे हे प्रमाण ८ वर्षांतील सर्वाधिक आहे.

गेल्या आठवड्यात हॉस्टेल आणि कोचिंग संस्थांमध्ये आत्महत्या प्रतिबंधक पंखे लावण्याचे आदेश दिले गेले होते. असं असुनही रविवारी ४ तासांत दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या करण्याच्या घटना घडल्या आहेत.

या महिन्याच्या सुरुवातीला आत्महत्या करणारा भार्गव बिहारच्या पूर्व चंपारणमधून कोटा येथे इंजीनिअर बनण्याचे स्वप्न घेऊन गेला होता. त्याचे वडील जितेंद्र मिश्रा म्हणतात की कदाचित त्याच्यावर दबाव होता. त्याची तब्येत बरी नसल्याचे त्याने आईला सांगितले होते.

मी त्याला घरी यायला सांगितले पण त्याने नकार दिला. एके दिवशी जितेंद्र मोबाईलवर एका विद्यार्थ्याच्या आत्महत्येची बातमी पाहत होता. नंतर त्याने भार्गवला फोन केला. भार्गव आता राहिलेला नाही, असे दुसरीकडून सांगण्यात आले.

Kota
Moon Mission: चंद्राची स्वारी भारी अवघड; बऱ्याचशा मोहिमा ठरतायत अयशस्वी; अंतराळात जाणं एवढं अवघड का?

वडिलांना भेटल्यानंतर यूपीच्या मनीषने फाशी घेतली

१७ वर्षीय मनीष सहा महिन्यांपूर्वी यूपीतील आझमगड येथून कोटा येथे गेला होता. हॉस्टेलमध्ये राहून तो जेईईची तयारी करत होता. कोचिंगच्या शेवटच्या परीक्षेत नंबर कमी आल्यावर वडील १० ऑगस्टला भेटायला आले. लोकांचे म्हणणे आहे की, वडिलांनी त्याला ओरडले आणि रागाच्या भरात तिथून निघून गेले. त्यानंतर चार तासांनी मनीषने गळफास घेऊन आत्महत्या केली.

कोणत्या वर्षी किती मुलांनी आत्महत्या केली

  • 2015-18

  • 2016-17

  • 2017-07

  • 2018-20

  • 2019-18

  • 2020-0 (लॉकडाउन)

  • 2021-0 (लॉकडाउन)

  • 2022-15

Kota
Lok sabha Election 2024 : 'चांद्रयानावरून जरी प्रचार केला तरी भाजपचा पराभव अटळ!', सामनातून टीकास्त्र

ही लक्षणे ओळखा

1. पालकांशी फोनवर जास्त न बोलणे

2. कोचिंगला गेल्यानंतर मुलाच्या आवाजात बदल होणे हे देखील एक लक्षण आहे.

3. कोचिंगला गेलेले मूल सतत तक्रार करत राहते.

4. कोचिंगला गेल्यावर मुलाची तब्येत बिघडणे, नेहमी आजारी राहणे.

असे केले प्रयत्न

● कोणतीही कोचिंग संस्था त्यांच्या जाहिरातीमध्ये प्रवेशाची गॅरंटी देणार नाही.

● कोचिंग संस्थेला रविवार सुट्टी द्यावी लागेल.

● सुट्टीच्या दिवशी कोणतीही टेस्ट घेतली जाणार नाही.

● विद्यार्थ्यांनी मध्येच कोचिंग सोडल्यास फी परत मिळेल.

● प्रत्येक कोचिंग सेंटरमध्ये करिअर काउंसलरच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

● गेल्या आठवड्यात हॉस्टेल आणि कोचिंग संस्थांमध्ये अँटी सुसाइड फॅन बसवण्याचे आदेश जारी करण्यात आले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com