IPS Officer : सुकेश चंद्रशेखरकडून 12.5 कोटींची लाच घेतल्याप्रकरणी IPS अधिकारी निलंबित; गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय

तिहार जेलचे (Tihar Jail) डीजी संदीप गोयल (DG Sandeep Goel) यांच्याबाबत मोठी बातमी समोर येत आहे.
DG Sandeep Goel
DG Sandeep Goelesakal
Updated on
Summary

तिहार जेलचे (Tihar Jail) डीजी संदीप गोयल (DG Sandeep Goel) यांच्याबाबत मोठी बातमी समोर येत आहे.

नवी दिल्ली : तिहार जेलचे (Tihar Jail) डीजी संदीप गोयल (DG Sandeep Goel) यांच्याबाबत मोठी बातमी समोर येत आहे. फसवणूक प्रकरणात तुरुंगात असलेल्या सुकेश चंद्रशेखरकडून (Sukesh Chandrasekhar) 12.5 कोटींची लाच घेतल्याप्रकरणी गृह मंत्रालयानं कठोर निर्णय घेत IPS संदीप गोयल यांना निलंबित केलंय.

संदीप गोयल (IPS Sandeep Goel) यांचं लाच प्रकरण समोर आल्यानंतर गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार, दिल्लीच्या उपराज्यपालांनी त्यांना पोलीस मुख्यालयातून निलंबित केलं होतं. त्यांच्या जागी वरिष्ठ आयपीएस अधिकारी संजय बेनिवाल यांना पदभार देण्यात आला.

DG Sandeep Goel
Railway TT : रेल्वेत परदेशी तरुणीचा विनयभंग; एकटी असल्याचं पाहून TT नं केला चुंबन घेण्याचा प्रयत्न

4 नोव्हेंबर 2022 रोजी 1989 बॅचचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी आणि तिहार जेलचे डीजी संदीप गोयल यांची बदली करण्यात आली. दिल्लीचे नायब राज्यपाल व्हीके सक्सेना यांच्या आदेशानुसार, दिल्ली सरकारच्या गृह विभागाचे उपसचिव शैलेश कुमार यांनी हे आदेश जारी केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com