Railway TT : रेल्वेत परदेशी तरुणीचा विनयभंग; एकटी असल्याचं पाहून TT नं केला चुंबन घेण्याचा प्रयत्न

जर्मनीची मुलगी पुष्करहून जयपूरला परतत असताना ही घटना घडलीये.
Ajmer Police Station
Ajmer Police Stationesakal
Updated on
Summary

जर्मनीची मुलगी पुष्करहून जयपूरला परतत असताना ही घटना घडलीये.

राजधानी जयपूरमध्ये (Jaipur) एका परदेशी तरुणीचा विनयभंग केल्याची घटना समोर आलीये. रेल्वेत (Railway) काम करणाऱ्या सरकारी कर्मचारी असलेल्या टीटीनं (TT) परदेशातून जयपूरला भेट देण्यासाठी आलेल्या 25 वर्षीय तरुणीचा विनयभंग केलाय.

मिळालेल्या माहितीनुसार, जर्मनीची (Germany Girl) मुलगी पुष्करहून जयपूरला परतत असताना ही घटना घडलीये. टीटीनं मुलीला एसी कोचमध्ये बसवण्याच्या नावाखाली तिचा विनयभंग केल्याचं सांगण्यात येत आहे. या प्रकरणाची तक्रार घेऊन पीडितेनं अजमेरमधील पोलीस स्टेशन (Ajmer Police Station) गाठलं, तिथून पोलिसांनी तिला जीआरपी ठाण्यात पाठवलं. तिथं मुलीची तक्रार नोंदवण्यात आलीये.

Ajmer Police Station
Narendra Modi : भारतात पुन्हा Lockdown लागणार? PM मोदींनी बोलावली उच्चस्तरीय बैठक

तर, दुसरीकडं या प्रकरणाची माहिती मिळताच डीआरएम कार्यालयानं रेल्वेच्या अंतर्गत शाखेच्या तपासानंतर टीटी विशाल सिंह शेखावत यांना तत्काळ निलंबित केलंय. जीआरपी पोलिस ठाण्याचे सीआय संपत राज यांनी सांगितलं की, 'जयपूरहून अजमेरला जात असताना टीटीनं जर्मन मुलीचा विनयभंग केला. त्या संदर्भात तक्रार आली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी टीटीला चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे.'

Ajmer Police Station
Rohit Pawar : निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच आदित्य ठाकरेंवर खोटे आरोप; पवारांचा शिंदेंच्या खासदारावर घणाघात

एसी कोचमध्ये विनयभंग

तरुणीनं तक्रारीत म्हटलंय की, 13 डिसेंबरला मी जनरल कोचनं अजमेरला जात होती. त्यावेळी टीटी तिथं आला आणि तो माझ्याशी बोलू लागला. टीटीनं मला एसी कोच देतो, असं सांगितलं आणि ही जागा माझ्यासाठी योग्य नसल्याचंही तो म्हणाला. त्यानंर टीटीनं मला एसी कोचकडं नेलं. तिथं नेल्यानंतर टीटीनं अचानक डब्याचा दरवाजा बंद केला आणि माझं चुंबन घेण्याचा प्रयत्न केला, असा तिनं आरोप केलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com