Sukesh Chandrashekhar : लीक व्हिडीओबद्दल सर्वोच्च अधिकाऱ्याला पत्र; सत्येंद्र जैनांवर पुन्हा आरोप | Sukesh Chandrashekar claims raid video leaked by jail staffer who wanted to act in Bollywood | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sukesh Chandrasekhar
Sukesh Chandrashekhar : लीक व्हिडीओबद्दल सर्वोच्च अधिकाऱ्याला पत्र; सत्येंद्र जैनांवर पुन्हा आरोप

Sukesh Chandrashekhar : लीक व्हिडीओबद्दल सर्वोच्च अधिकाऱ्याला पत्र; सत्येंद्र जैनांवर पुन्हा आरोप

खंडणीच्या आरोपाखाली सध्या कारागृहात शिक्षा भोगत असलेला आरोपी सुकेश चंद्रशेखर याने दिल्लीच्या लेफ्टनंट गव्हर्नरला एक पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्याने आपल्या कारागृहातल्या व्हायरल झालेल्या व्हिडीओबद्दल खुलासा केला आहे. व्हि़डीओ लीक करणाऱ्या कर्मचाऱ्याला बॉलिवूडमध्ये काम करायचं होतं. त्याने बॉडिबिल्डींगसाठी पैसे घेतल्याचंही सुकेशने म्हटलं आहे.

सुकेशच्या जेलमधलं सीसीटीव्ही फुटेज नुकतंच लीक झालं होतं. यामध्ये जेलचे अधिकारी सुकेशच्या सेलमध्ये छापा टाकून सुकेशजवळच्या महागड्या वस्तू ताब्यात घेताना दिसत आहेत. आपल्या पत्रामध्ये सुकेशने जेलमधल्या दोन अधिकाऱ्यांचं नाव घेतलं आहे. आत्तापर्यंत या दोघांनी आपल्याकडून अनेकदा पैसे घेतल्याचं त्याने सांगितलं आहे.

सुकेशने असंही म्हटलंय की त्यातल्या एका अधिकाऱ्याला बॉलिवूडमध्ये काम करायचं होतं, म्हणून त्याने आपल्याला बॉलिवूड दिग्दर्शकांची ओळख करून द्यायला लावलं. तसंच त्याने एकट्याने आपल्याकडून ३० लाख रुपये उकळल्याचंही सुकेशने सांगितलं.

सत्येंद्र जैन यांच्या ईडी कारवाईवरुन लक्ष वळवण्यासाठी त्यांच्याच सांगण्यावरुन हा व्हिडीओ व्हायरल करण्यात आल्याचा आरोपही सुकेश चंद्रशेखरने केला आहे. माझ्या कोठडीतून जप्त करण्यात आलेलं काहीही बेकायदेशीर नव्हतं. माझ्याकडे असलेल्या सगळ्या गोष्टी परवानगी घेऊन आणलेल्या आहेत. मी गेल्या चार महिन्यांपासून या कोठडीत आहे, अनेकदा छापे पडले आहेत, पण तेव्हा काहीच कसं सापडलं नाही?, असा सवालही सुकेशने आपल्या पत्रातून विचारला आहे.

टॅग्स :delhi