Sukesh Chandrashekhar : "परदेशी माध्यमांना बातम्या छापायला केजरीवालांनी साडे आठ लाख डॉलर दिले" | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sukesh Chandrashekhar Arvind Kejriwal
Sukesh Chandrashekhar : "परदेशी माध्यमांना बातम्या छापायला केजरीवालांनी साडे आठ लाख डॉलर दिले"

Sukesh Chandrashekhar : "परदेशी माध्यमांना बातम्या छापायला केजरीवालांनी साडे आठ लाख डॉलर दिले"

मनी लाँड्रिंग प्रकरणात अटकेत असलेल्या सुकेश चंद्रशेखर याने अनेकदा आप नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. आता सुकेशने पाचवं पत्र लिहिलं आहे. यामध्ये अरविंद केजरीवालांनी परदेशी माध्यमांना आपल्या बातम्या छापायला ८.५० डॉलर्स दिल्याचा दावा त्याने या पत्रातून केला आहे.

आपल्या पत्रात सुकेश चंद्रशेखर म्हणतो, "केजरीवालजी, जर मी महाठग आहे, तर तुम्ही मला दिल्लीच्या सरकारी शाळांच्या प्रमोशनसाठी आंतरराष्ट्रीय पीआरची व्यवस्था करण्यास का सांगितले?" न्यूयॉर्क टाइम्स, वॉशिंग्टन पोस्ट यासारख्या वृत्तपत्रांमध्ये पेड न्यूजसाठी ८ लाख ५० हजार डॉलर्स आणि १५ टक्के अतिरिक्त कमिशन दिल्याचा दावा त्याने केला आहे.

हेही वाचा - हिंदी चित्रपटांत का वाढते आहे हिंदुत्वाची कट्टरता?

"आजपर्यंत कोणीही केले नाही, असे प्रमोशन व्हायला हवे, असा त्यांचा उद्देश होता. त्यानंतर आधी संपूर्ण पैसे अमेरिकन खात्यात टाकायला सांगितले होते, पण नंतर सतेंद्र जैन यांनी पूर्ण पेमेंट रोख द्यायला सांगितले. माझ्याकडून तुम्ही पैसे व्हाईट केले", असं सुकेशने पुढे म्हटलं आहे. तसंच केजरीवाल, सत्येंद्र जैन यांचीही पॉलिग्राफ चाचणी व्हावी, अशी मागणीही त्याने केली आहे.

सुकेश चंद्रशेखरने पुढे म्हटलं आहे, "केजरीवालजी, मला आठवतं की मी तुम्हाला घड्याळ दिलं होतं. तुम्ही मला त्याचा पट्टा बदलून निळ्या रंगाचा पट्टा लावायला सांगितलं होतं. सत्येंद्र जैनजी, तुम्हाला आठवत असेल की मी दुबईच्या चार्टर्ड विमानातून कोणालातरी केजरीवाल यांच्या घड्याळाचा पट्टा बदलण्यासाठी पाठवले होते."

टॅग्स :Arvind Kejriwal