Sukma Encounter: बेपत्ता जवान ताब्यात असल्याचा नक्षलवाद्यांचा दावा; सुटकेसाठी ठेवली अट

sukma encounter
sukma encounter
Updated on

रायपूर- छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात बेपत्ता असलेला सुरक्षा दलाचा एक जवान नक्षलवाद्यांच्या ताब्यात आहे. नक्षलवाद्यांनी पत्रकारांशी बोलताना हा दावा केला आहे. त्यांनी फोनवर सांगितलं की, ते जवानाला कोणतेही नुकसान पोहोचवणार नाहीत. पण, त्याच्या सुटकेसाठी नक्षलवाद्यांनी एक अट ठेवली आहे. बेपत्ता झालेला जवानाचे नाव राजेश्वर सिंग मनहास असं आहे. तो जम्मू-काश्मीरचा रहिवाशी असून कोब्रा टीमचा कमांडो आहे. नक्षलवाद्यांनी पत्रकारांना फोन करुन अट ठेवलीये की, ते राजेश्वर सिंहला सोडण्यासाठी तयार आहेत, पण त्यांना वचन द्यावं लागेल की, ते सुरक्षा दलाच्या सेवेतून मुक्त होतील आणि नोकरी सोडल्यानंतर ते दुसरं काम करतील. नवभारत टाईम्सने यासंदर्भातील वृत्त दिलंय.

राजेश्वर सिंह यांच्या कुटुंबियांनी लष्कराकडे विचारणा केली आहे. कंट्रोल रुमने राजेश्वर हे बेपत्ता असल्याचं म्हटलं आहे, तर माध्यमांमध्ये ते नक्षलवाद्यांच्या ताब्यात असल्याचं सांगण्यात आलंय. राजेश्वर यांची आई, पत्नी आणि लहान मुलगी यांना दु:ख अनावर झालंय. राजेश्वर यांच्या पत्नीने छत्तीसगड सरकारकडे मागणी केलीये की, 'नक्षलवाद्यांची काहीही मागणी असो, ती पूर्ण केली जावी. माझे पती गेल्या ४ वर्षांपासून कोब्रा कमांडो म्हणून ड्यूटी करत आहेत. सरकारला आपल्या जवानाला परत आणावं लागेल. ते माझे केवळ पती नाहीत, तर देशाचे जवान आहेत. माझ्या सासऱ्यांनी सीआरपीएफमध्ये असताना आपला जीव गमावला होता.' 

आईची पंतप्रधान मोदींकडे विनंती

राजेश्वर यांच्या आईचे म्हणणं आहे की, शुक्रवारी सकाळी नऊ वाजता मुलासोबत फोनवर बोलणं झालं होतं. त्यावेळी त्याने सांगितलं होतं की, मी ऑपरेशनवर जात आहे, शनिवारी तुझ्याशी बोलेन. त्यानंतर मी अनेकदा फोन लावण्याचा प्रयत्न केला पण, फोन लागला नाही. पंतप्रधान मोदी यांना माझी विनंती आहे, त्यांनी माझ्या मुलाला परत आणावं. तो आमच्या परिवाराचा एकमेव आधार आहे. 

नक्षलवादी हल्ल्यात 24 जवान शहीद

छत्तीसगडच्या नक्षलवादी हल्ल्यात 24 जवान शहीद (bijapur encounter news) झाले आहेत. कुख्यात नक्षलवादी हिडमाला पकडण्यासाठी जवानांनी त्यांच्या क्षेत्रात प्रवेश केला होता. 2000 जवानांची टीम वेगवेगळ्या भागात हिडमाच्या टीमला पकडण्याठी जंगलात शिरली होती. सुरुवातीला नक्षलवाद्यांनी जवानांना जंगलात शिरु दिलं, त्यांना कोणीही डिस्टर्ब केलं नाही. सुरक्षा दलांची टीम अनेक भागात विखुरलेली होती. एका टीमला हिडमाच्या बटालियनने  (naxali hidma) आपल्या जाळ्यात अडकवलं. त्यानंतर जवानांची घेराबंदी करुन त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com